Bigg Boss OTT 2 | सलमान खानने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीला जोरदार फटकारलं; खासगी आयुष्याबद्दल म्हणाला..

आलिया ही नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी असून दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आलियाने नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. आरोप-प्रत्यारोपांनंतर अखेर नवाजुद्दीनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं होतं.

Bigg Boss OTT 2 | सलमान खानने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीला जोरदार फटकारलं; खासगी आयुष्याबद्दल म्हणाला..
सलमान खानने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीला जोरदार फटकारलंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 10:00 AM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडची सुरुवात मोठ्या ड्रामाने झाली. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी सुपरस्टार पुनीतला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर खूप मोठा ड्रामा झाला होता. तर आता सलमान खानने नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरीची शाळा घेतली आहे. त्याचसोबत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकीलाही त्याने सुनावलं आहे. बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये बेबिका धुर्वेबद्दल आकांक्षा खोटं बोलली होती. या सर्व गोष्टींमुळे सलमान तिच्यावर भडकला होता.

नवाजुद्दीनच्या पत्नीलाही सुनावलं

बेबिका आणि आकांक्षा यांच्यामधील वादादरम्यान सलमानने आलिया सिद्दिकीलाही चांगलंच सुनावलं. “तू त्यांना बोलावण्याऐवजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू शकली असती”, असं तो तिला म्हणतो. इतक्याच आकांक्षा पुन्हा मध्ये बोलते. “म्हणूनच मी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. आलिया आणि मी सुट्ट्यांच्या बाबतीत आणि खासगी आयुष्याबद्दल गप्पा मारत होतो आणि बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या घटनांचा त्यात काहीच संबंध नव्हता”, असं स्पष्टीकरण आकांक्षा देते.

सलमानने आकांक्षालाही फटकारलं

आकांक्षाचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर सलमान तिला म्हणतो, “तुम्ही अशा गप्पा का मारत होता? बिग बॉसच्या घराला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. जर तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर घराबद्दल बोला. आम्हाला आलियाचं खासगी आयुष्य आणि तिच्या सुट्ट्यांबद्दल जाणून घेण्यात काही रस नाही.”

हे सुद्धा वाचा

सलमानने आलियाला दिला सल्ला

या सर्व वादानंतर सलमानने आलियाला सल्ला दिला. “आम्हाला तुझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात काडीमात्र रस नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल की शोमध्ये येऊन खासगी आयुष्याबद्दल बोलून प्रसिद्धी मिळवू, तर असं होणार नाही. घराच्या आत आणि बाहेर तुम्ही आधीच बरंच काही बोलला आहात. सर्वांना मुलाखती देऊन तुम्ही तुमची बाजू स्पष्ट केली आहे”, असं तो तिला म्हणतो. सलमानने आलियाला तिच्या खासगी आयुष्याबद्दल बिग बॉसच्या घरात बोलण्यास सक्त मनाई केली आहे. या चर्चेअखेर आलियासुद्धा सलमानला आश्वासन देते.

आलिया ही नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी असून दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आलियाने नवाजुद्दीनवर बरेच आरोप केले होते. आरोप-प्रत्यारोपांनंतर अखेर नवाजुद्दीनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी मौन बाळगल्यामुळे सर्वत्र मला वाईट ठरवलं जातंय. माझं गप्प राहण्याचं कारण म्हणजे हा सर्व तमाशा (नाटक) कुठेतरी माझी लहान मुलं वाचू नयेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, माध्यमं आणि काही लोकं खरंच एकतर्फी आणि फेरफार करून शूट केलेल्या व्हिडीओच्या आधारावर होत असलेल्या माझ्या चारित्र्याच्या हत्येचा आनंद घेत आहेत’, असं त्याने लिहिलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.