Elvish Yadav | अर्जुन बिजलानीवरील ‘त्या’ कमेंटमुळे बिग बॉस विजेता एल्विश यादव तुफान ट्रोल

विजेतेपद पटकावून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून प्रसिद्ध युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर एल्विश यादव सतत चर्चेत आहे. नुकतीच त्याने अभिनेता अर्जुन बिजलानीवर एक कमेंट केली. या कमेंटमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

Elvish Yadav | अर्जुन बिजलानीवरील 'त्या' कमेंटमुळे बिग बॉस विजेता एल्विश यादव तुफान ट्रोल
Elvish Yadav and Arjun BijlaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 9:41 AM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादव सध्या त्याच्या म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा ‘हम तो दिवाने’ हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. यामध्ये तो अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय तो लवकरच अभिनेत्री ईशा गुप्तासोबत आणखी एका गाण्यात झळकणार आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून एल्विशला बरेच ऑफर्स मिळत आहेत. अशातच तो अभिनेता अर्जुन बिजलानीच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यामुळेही चर्चेत आला आहे. या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘बिग बॉस ओटीटी 2’ची माजी स्पर्धक जिया शंकरशी संबंधित आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जिया शंकरने नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. ‘लोक वेड्यासारखे सोशल मीडियावर भांडत आहेत. कठीण काळातही माझ्या चेहऱ्यावर हास्य असतं, कारण तो माझा मूळ स्वभाव आहे. मात्र काही लोकांना फक्त टोमणे मारायला आवडतं. मी हे अनेकदा बोलली आणि आता पुन्हा एकदा बोलते की अभिषेक मल्हानच बिग बॉसचा विजेता बनण्यालायक होता. इतर लोकांना जे करायचं असेल ते करू द्या’, असं तिने लिहिलं होतं. जिया आणि अभिषेकची मैत्री ही बिग बॉस सुरू झाल्यापासूनच चांगली होती. मात्र काही लोकांना तिची ही पोस्ट आवडली नाही. जियाच्या याच पोस्टवर अर्जुन बिजलानीने ट्विट केलं होतं. हा ट्विट चांगलाच व्हायरल झाला होता.

एल्विश यादव ट्रोल

‘बिग बॉसमध्ये जाऊन आल्यापासून काही लोक आणि त्यांचे फॅन क्लब्स ही गोष्ट विसरले आहेत की महिलांचा आदर कसा केला पाहिजे. दु:खद’, अशा शब्दांत अर्जुनने नाराजी व्यक्त केली. त्यावर एल्विशने प्रतिक्रिया देत लिहिलं, ‘मला आता समजलं की तू महिला आहेस.’ एल्विशच्या या कमेंटनंतर अर्जुनच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. ‘असे लोक बिग बॉसचे विजेते आणि आजच्या काळातील इन्फ्लुएन्सर आहेत, हे पाहून आणखी वाईट वाटतं’, असं एकाने लिहिलं. तर बिग बॉसनंतर एल्विशचा अहंकार आणखी वाढला आहे, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस ओटीटी 2’च्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचाच दबदबा पाहायला मिळाला. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने या सिझनचं विजेतेपद आपल्या नावे केलं. ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा रिॲलिटी शो जिंकल्यापासून एल्विशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. म्युझिक व्हिडिओपासून ते चित्रपटांपर्यंत त्याला असंख्य ऑफर्स येत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.