Elvish Shehnaaz | शहनाज गिलसोबत एल्विश यादवची डिनर डेट; दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव आणि बिग बॉस 13 ची माजी स्पर्धक शहनाज गिल यांना एकत्र पाहिलं गेलं. या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यात काहीतरी शिजतंय, अशी चर्चा सुरू झाली.

Elvish Shehnaaz | शहनाज गिलसोबत एल्विश यादवची डिनर डेट; दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण
एल्विश यादव, शहनाज गिलImage Credit source: Instagram/viral bhayani
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 4:02 PM

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सिझन संपल्यानंतरही त्यातील स्पर्धक विविध कारणांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो बिग बॉस 13 मधली माजी स्पर्धक शहनाज गिलसोबत दिसून येत आहे. शहनाज आणि एल्विशला एकत्र पाहिल्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमध्ये एल्विश यादव आणि शहनाज गिल हे दोघं एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहेत.

यावेळी शहनाजने ओवरसाईज्ड शर्ट परिधान केला आहे. त्यासोबतच हलक्या निळा रंगाची जीन्स आणि बूट घातले आहेत. एकीकडे शहनाजचा स्टायलिश अंदाज दिसून आला. तर दुसरीकडे एल्विश यादव ब्लॅक टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये पाहायला मिळाला. हे दोघं एकाच वेळी कारमध्ये बसताना दिसले. बिग बॉसच्या या दोन चर्चेतल्या स्पर्धकांना एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. एका युजरने लिहिलं, ‘ओके.. दोघंजण सोबत खूप चांगले दिसत आहेत.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, ‘सिद्धार्थ शुक्लानंतर पहिल्यांदाच शहनाज कोणासोबत तरी चांगली दिसतेय. या दोघांमधील मैत्री अशीच पुढे जाऊ दे.’ तर आणखी एका युजरने म्हटलंय की, ‘ही भेट फारच अनपेक्षित होती. पण या दोघांना एकत्र पाहून चांगलं वाटलं.’

हे सुद्धा वाचा

बिग बॉस 13 मध्ये शहनाजचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडलं गेलं. चाहत्यांनी या दोघांना सिडनाज असं टोपणनावही दिलं होतं. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. काही महिन्यांनंतर ती पुन्हा सोशल मीडियावर आणि कामावर परतली. बिग बॉस ओटीटी 2 चा विजेत एल्विश यादव लवकरच शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ य़ा शोमध्ये हजेरी लावणार आहे. नुकतंच या दोघांनी त्या कार्यक्रमाचं शूटिंग पूर्ण केलं. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणारा एल्विश जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक काळ तिथे टिकून राहिला. याआधी वाइल्ड कार्डद्वारे आलेला कोणताच स्पर्धक विजेता ठरला नव्हता. एल्विशने प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान, अभिनेत्री पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांना हरवलं. बिग बॉसची ट्रॉफी आणि 25 लाखांचं रोख बक्षीस त्याने आपल्या नावे केलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.