अनिल कपूर यांचा संताप, एल्विश यादव याला सुनावले खडेबोल, म्हणाले, तू काय…

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. बिग बॉसची प्रेक्षकांमध्ये क्रेझही आहे. बिग बॉस ओटीटी 3 सीजन हिट होताना दिसतोय. आता नुकताच बिग बॉसमध्ये विकेंडचा वार झालाय. यावेळी घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना अनिल कपूर हे दिसले आहेत.

अनिल कपूर यांचा संताप, एल्विश यादव याला सुनावले खडेबोल, म्हणाले, तू काय...
Anil Kapoor
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 1:28 PM

बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. प्रेक्षकांमध्ये या सीजनबद्दल चांगलीच क्रेझ देखील बघायला मिलळंय. विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि अरमान मलिक हे बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक चर्चेत असणारी नावे आहेत. विशाल पांडे याने अरमान मलिकच्या पत्नीबद्दल अत्यंत चुकीची कमेंट केली. ज्यानंतर घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. अरमान मलिक याने थेट विशाल पांडे याच्या कानाखाली मारली. मागच्या विकेंडच्या वारमध्ये चंद्रिका दीक्षित हिचा चांगलाच क्लास अनिल कपूर यांनी लावला होता. त्यानंतर ती बिग बॉसमधून बाहेरही पडली.

आता नुकताच विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर यांचा संताप चांगलाच वाढल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव हा नुकताच बिग बॉस ओटीटी 3 च्या मंचावर आपल्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी आला. मात्र, एल्विश यादव याचे बोलणे ऐकून अनिल कपूर चांगलेच चिडल्याचे बघायला मिलाले.

त्याचे झाले असे की, अनिल कपूर यांनी एल्विश यादव याला विचारले की, अदनान याने बाहेरची बातमी घरातील लोकांसोबत का शेअर केली. यावर बोलताना एल्विश यादव हा म्हणाला की, सर मी तुम्हाला सांगितले ना…त्याला मेडिकल प्रॉब्लेम आहे. थोडा मेडिकल प्रॉब्लेम आहे डॉक्टरवाला. त्याला डोक्याची समस्या आहे.

हे बोलणे परत परत बोलताना एल्विश यादव हा दिसला. प्रश्नाचे सरळ उत्तर एल्विश यादव हा देत नसल्याने अनिल कपूर यांचा पारा चढला. अनिल कपूर यांनी एल्विश यादव याला म्हटले की, मजाक एकवेळ ठिक वाटते परत परत नाही. तुला काय वाटते…मेडिकल प्रक्रिया न करताच अदनानला बिग बॉसने घरात प्रवेश दिलाय?

मी काही प्रश्न विचारतोय आणि तू सारखा मजाकमध्ये उत्तरे देत आहे. यानंतर एल्विश यादव याने अनिल कपूर यांची माफी मागितली आणि उत्तरे दिली. एल्विश यादव हा लवकेश कटारिया याचा चांगला मित्र आहे. त्यालाच सपोर्ट करण्यासाठी तो बिग बॉसच्या मंचावर आला. एल्विश यादव याच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाहीतर काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ ही एल्विश यादव याच्यावर आली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.