बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अरमान मलिक हा सर्वाधिक चर्चेत आहे. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिच्याबद्दल विशाल पांडे याने हैराण करणारे भाष्य केले. अत्यंत चुकीचे वाक्य विशाल हा कृतिकाबद्दल बोलला होता, याचा खुलासा पायल मलिक हिने बिग बॉसच्या मंचावर येत केला. त्यानंतर बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. हेच नाहीतर अरमान मलिक याने थेट विशाल पांडे याच्या कानाखाली जाळ काढला. बिग बॉसने आणि घरातील सदस्यांनी निर्णय घेत अरमान मलिक याला शोमध्ये असेपर्यंत नॉमिनेशनमध्ये टाकले आहे.
विशाल पांडे याने कृतिका मलिकबद्दल केलेल्या कमेंटनंतर घरातील सदस्यांनी विशालपासून एक अंतर ठेवले आहे. घरात काही ग्रुप बघायला मिळत आहेत. नुकताच आता कृतिका मलिक हिच्यावर चांगलाच भडकताना अरमान दिसत आहे. अरमानने कृतिकाला खडेबोल सुनावले आहेत. याचे कारणही विशाल पांडे हा असल्याचे दिसत आहे.
नॉमिनेशन टास्कच्या अगोदर कृतिका मलिक ही विशाल पांडे, लवकेश कटारिया आणि शिवानी कुमारी यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसताना दिसत आहे. हे पाहून अरमान मलिक याचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. अरमान मलिक हा कृतिका हिला म्हणतो की, इकडे ये, तुझे डोळे अजून उघडले नाहीत का?
यावर कृतिका म्हणते की, माझे डोळे उघडले आहेत आता, लगेचच कृतिका ही तिथून उठून अरमान मलिक याच्या शेजारी जाऊन बसते. त्यानंतर अरमान मलिक म्हणतो की, मला अजूनही तू डोळ्यांवर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. तुझ्यासाठी एक चष्मा लेन्सचा बनवावा लागेल. कृतिका मलिक म्हणते, तिथे शिवानीच्या शेजारी जागा होती म्हणून मी जाऊन बसले.
यानंतरही अरमान मलिक हा कृतिकाला खडेबोल सुनावताना दिसत आहे. मात्र, अरमान रागातच आहे, दुसरीकडे कृतिका ही अरमानला समजावत आहे. कृतिका, पायल आणि अरमान मलिक हे बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाले होते, मात्र पायल मलिक ही काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. आता सोशल मीडियावर सतत व्हिडीओ शेअर करताना पायल मलिक ही दिसत आहे.