अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने केली प्रेग्नंसी टेस्ट, पायल होणार चाैथ्यांदा…
अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. अरमानच्या दुसऱ्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान केल्याने विशाल पांडे याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हेच नाहीतर विशालला घरातील सदस्यांनी टार्गेट केल्याचे बघायला मिळाले. घरातील वाद हा चांगलाच वाढला होता.
अरमान मलिक हा त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाला. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाकेदार गेम खेळताना अरमान मलिक हा दिसतोय. पायल मलिक ही बेघर झालीय तर दुसरीकडे अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही अजूनही बिग बॉसच्या घरात आहे. यंदाचे बिग बॉस ओटीटी 3 चे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझही बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात नुकताच मोठा वादही बघायला मिळाला. कवकेश कटारिया आणि साई चेतन राव यांच्यात जोरदार हंगामा झाला.
अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसच्या घरातून बाहेर आलीये आणि आपल्या घरासोबतच मुलांनाही सांभाळत आहे. मात्र, पायल मलिक हिने प्रेग्नंसी टेस्ट केलीये. अगोदरच पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे, दुसरीकडे कृतिकाला एक मुलगा आहे. सर्वजण एकत्रच राहतात.
पायल मलिक हिने प्रेग्नंसी टेस्ट केल्याचा खुलासा केलाय. पायल मलिक ही व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे की, मी प्रेग्नंसी टेस्ट केलीये. यानंतर पायल मलिक ही चाैथ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगताना दिसतंय. पायल हिने प्रेग्नंसी टेस्ट केली हे खरे आहे पण तिने आता नाहीतर बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी होण्याच्या अगोदर ही प्रेग्नंसी टेस्ट केली.
याबद्दलच आता खुलासा करताना पायल मलिक ही दिसली. पायल मलिक म्हणाली की, मी प्रेग्नंसी टेस्ट केली होती. मात्र, ही टेस्ट बिग बॉसच्या घरात जाण्याच्या अगोदर केली होती. मुळात म्हणजे घरात जाताना ही टेस्ट करावीच लागले. पायल मलिकने काही दिवसांपूर्वीच एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला.
पायल मलिक ही तिच्या कमी झालेल्या वजनाबद्दलही बोलताना दिसली. पायल मलिक म्हणाली की, काही दिवसांपूर्वीच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आता आपोआपच वजन कमी होत आहे. बरेच टेन्शन आहे. अरमान आणि कृतिका बिग बॉसच्या घरात आहेत. काहीतरी गोष्टी तिथे घडतात आणि लोक सोशल मीडियावरही खडेबोल सुनावतात. चार मुलांची जबाबदारीही माझ्या एकटीवरच आहे.