अरमान मलिकच्या दोन लग्नानंतर आता सासऱ्याचेही होणार दुसरे लग्न, कृतिका मलिकच्या आईने…
अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला. यावेळी अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका होताना दिसली. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत.
अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र, पायल मलिक ही बिग बॉसमधून बाहेर पडलीये. बिग बॉसच्या घरात अरमान मलिक आणि कृतिका मलिक हेच आहेत. कृतिका मलिक ही अरमान मलिक याची दुसरी पत्नी आहे. पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच अरमान याने कृतिकासोबत लग्न केले. विशेष म्हणजे आज कृतिका आणि पायल या बहिणींसारखे एकाच छताखाली राहतात. पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिका मलिक हिला एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने म्हटले होते की, तो 200 कोटी संपत्तीचा मालक आहे.
अरमान, कृतिका आणि पायल व्लॉगच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतात. सोशल मीडियावर यांची फॅन फॉलोइंगही जबरदस्त अशी बघायला मिळते. विशेष म्हणजे कृतिका मलिक आणि अरमान हे बिग बॉसच्या घरात देखील धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. आता नुकताच कृतिका मलिक हिच्या आईने अत्यंत मोठा खुलासा केलाय.
कृतिका मलिक हिची आई देखील व्लॉगिंग करते. कृतिका मलिक हिच्या आईने म्हटले की, मला माझ्या पतीचे दुसरे लग्न करायचे आहे, कोणी मुलगी असेल तर सांगा. मी माझ्या पतीचा बायोडाटा शेअर करते. हे ऐकून कृतिका मलिकची बहीण म्हणते की, माझे लग्नाचे वय असताना त्यांचे लग्न? यावर तिची आई म्हणते की, बरे आहे ना एका फंक्शनमध्ये दोन काम होतील.
पुढे कृतिका मलिक हिची आई म्हणते की, माझा पती खूप जास्त शांत आहे. आमचे ज्वेलरीचे दुकान आहे आणि मोठे घरही आहे. तुमच्या बघण्यात कोणी असेल तर संपर्क करा आणि चांगली महिला हवी आहे, कारण माझा पतीही खूप जास्त चांगला आहे. बाकी मी लग्नासाठी त्यांना राजी करते. यासोबतचे पतीचे वयही सांगताना कृतिका मलिक हिची आई दिसत आहे.
आता कृतिका मलिक हिच्या आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय. या व्हिडीओनंतर कृतिका मलिक हिच्या आईवर जोरदार टीका होताना दिसत आहे. एकाने म्हटले की, या फक्त मजाक करत आहेत. दुसऱ्याने लिहिले की, आता समजले की, कृतिका मलिक ही नेमकी कोणावर गेली ते.