Bigg Boss OTT 3 : कोणता स्पर्धक सर्वात जास्त महागडा? नाव जाणून व्हाल हैराण
Bigg Boss OTT 3 Highest Paid Contestant: 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये कोणता स्पर्धक आहे सर्वात जास्त महागडा? स्पर्धकाचं नाव जाणून व्हाल हैराण, सर्वत्र त्याच्या मानधनाची चर्चा, 'बिग बॉस ओटीटी 3' मुळे अनेक सोशल मीडिया स्टारच्या लोकप्रियतेत वाढ...
‘बिग बॉस ओटीटी 3’ (Bigg Boss OTT 3 ) मध्ये स्पर्धकांनी स्वतःचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. शो सूरु झाल्यानंतर पहिल्यात आठवड्यात सोशल मीडिया स्टार पायल मलिक हिला घरातून बाहेर जावं लागलं. . शोच्या पहिल्या ‘विक एन्ड का वार’मध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट अनिल कपूर यांनी पायल मलिक हिला एलिमिनेट केलं आहे. अनिल कपूर यांनी मिळालेल्या मतांच्या आधारावर पायल हिला घरातून बाहेर केलं आहे. अशात शोमध्ये रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पायल शोमधून बाहेर गेल्यानंतर 15 स्पर्धक आता घरात आहेत. तर शोमध्ये सर्वांत जास्त महागडा स्पर्धक कोण आहे… जाणून घेऊ.
‘बिग बॉस ओटीटी 3’ मधील स्पर्धक
यंदाच्या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात आहेत. यामध्ये अरमान मलिक, कृतिका मलिक, टीवी अभिनेता साई केतन राव, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, पॉलमी दास, सना सुल्तान, पत्रकार दीपक चौरसिया, सना मकबूल, लव कटारिया, शिवानी कुमारी, सोनम खान, नीरज गोयत, टॅरो कार्ड रीडर मुनीषा खतवानी, विशाल पांडे आणि रॅपर नावेद शेख शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.
कोणत्या स्पर्धकाला मिळत आहे सर्वात जास्त मानधन?
‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये प्रत्येक स्पर्धक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला वाटत असेल की सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोणी सेलिब्रिटी असेल किंवा मग कोणी युट्यूबर असेल… पण असं काहीही नाही. ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक एक पत्रकार आहे.
पत्रकार दीपक चौरसिया ‘बिग बॉस ओटीटी 3’ मधील सर्वात जास्त मानधन घेणारे स्पर्धक आहेत. दीपक चौरसिया यांच्यानंतर सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत कृतिका मलिक, अरमान मलिक, विशाल पांडे, नाएजी, रणवीर शौरी, लव कटारिया आणि सना मकबूल आहेत.
कोण आहेत दीपक चौरसिया?
दीपक चौरसिया एक प्रसिद्ध पत्रकार आहेत. 2003 मध्ये त्यांनी डीडी न्यूजमध्ये संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपक चौरसिया यांनी अनेक मीडिया संस्थांमध्ये काम केलं आहे. पुरस्कार विजेते पत्रकार दीपक चौरसिया अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत.
काही वर्षांपूर्वी दीपक चौरसिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते नशेत असताना बातम्या वाचत होते. त्या डिबेट शोमध्ये त्यांना बोलता देखील येत नव्हतं. तेव्हा शो तात्काळ बंद करण्यात आला होता. यामुळे त्यांची नोकरी देखील गेली होती. याशिवाय त्यांच्यावर अनेक वादही झाले आहेत.