Bigg Boss OTT 3 Winner: ‘या’ स्पर्धकाने कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. सना मकबूल, रणवीर शौरी, नेझी, साई केतन राव आणि कृतिका मलिक हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या पाच जणांपैकी कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार, त्याची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस ओटीटी 3’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. अभिनेता रणवीर शौरी, सना मकबूल, साई केतन राव, नेझी आणि कृतिका मलिक हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अनिल कपूर या सिझनचं सूत्रसंचालन करत असून अगदी पहिल्या एपिसोडपासूनच हा सिझन गाजतोय. विजेत्याला 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. ग्रँड फिनालेच्या काही तासआधीच ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या विजेत्याचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ‘द खबरी’ या ट्विटर अकाऊंटने ग्रँड फिनालेविषयीची माहिती उघड केली आहे.
टॉप 5 स्पर्धकांमधून कृतिका मलिक आणि साई केतन राव हे दोन स्पर्धक सर्वांत आधी घराबाहेर पडले. त्यामुळे सना मकबूल, रणवीर शौरी आणि नेझी हे तीन जण टॉप 3 स्पर्धक बनले. या तिघांमधूनही नंतर रणवीर बाद होतो आणि सना-नेझीमध्ये चुरस रंगते. सरतेशेवटी सना मकबूल ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पोलमध्येही सनाच विजयी ठरली आहे.
#BiggBossOTT3 Final prediction and Top 3 Rankings
1 #SanaMakbul winner 2 #Naezy Runner up 3 #RanvirShorey 2nd runner Up 3 #SaiKetanRao 5 #KritikaMalik
— The Khabri (@TheKhabriTweets) August 1, 2024
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पोलनुसार, सना मकबूलला 43.7 टक्के मतं मिळाली आहेत. तर नेझीला 23.4 टक्के मतं मिळाली आहेत. असं असलं तरी विजेत्याचं नाव हे ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या ग्रँड फिनालेमध्येच अधिकृतरित्या घोषित केलं जाणार आहे. प्रेक्षकांना हा ग्रँड फिनाले जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रात्री 9 वाजल्यापासून पहायला मिळेल. ग्रँड फिनालेच्या दोन दिवस आधी युट्यूबर अरमान मलिक आणि लवकेश कटारिया हे दोघं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. त्यापूर्वी स्पर्धकांना बिग बॉसच्या ट्रॉफीची झलक दाखवण्यात आली होती.
ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना सना मकबूल आणि रणवीर शौरी यांचा रोमँटिक परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. म्हणूनच सूत्रसंचालक अनिल कपूर मुद्दाम त्यांना एकत्र परफॉर्म करण्यास सांगतो. यंदाचा सिझन विविध कारणांमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत राहिला. युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली होती. त्यामुळे या सिझनविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यातच अनिल कपूर यांच्या अनोख्या स्टाइलनेही प्रेक्षकांची मनं जिंकली.