बिग बॉस ओटीटी 3 मध्ये चांगलाच धमाका बघायला मिळतोय. बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले दोन आठवड्यांवर आलाय. हे सीजन धमाकेदार कामगिरी करत आहे. या सीजनबद्दल चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ आहे. अनिल कपूर हे या सीजनला होस्ट करताना दिसत आहेत. या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये तीन सदस्य घरातून बाहेर पडले आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना सतत टास्क देखील दिले जात आहेत. अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झाला. मात्र, पायल मलिक ही काही दिवसांपूर्वीच बिग बॉसमधून बाहेर पडलीये.
बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात नुकताच मोठा हंगामा बघायला मिळालाय. ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहे. मात्र, शिवानी आणि कृतिका मलिक यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसतोय.
किचनमध्ये दोघी असताना त्यांच्यात वाद सुरू होतो. यावेळी रागात येऊन कृतिका हिच्यावर हात उचलताना शिवानी ही दिसते. शिवानी हिने मारल्यानंतर कृतिका हिचा देखील पारा चढतो. ती देखील शिवानी हिला धक्का देताना दिसत आहे. दोघींमधील वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.
ज्यावेळी शिवानी ही कृतिकाला मारताना दिसली, त्यावेळी तिच्या हातामध्ये चाकू होता. हे पाहून लवकेश कटारिया तिथे पोहोचतो आणि शिवानीच्या हातातील चाकू घेतो. दोघीही एकमेकींना बरेच काही बोलताना दिसत आहेत. मुळात म्हणजे शिवानी ही नेहमीच बिग बॉसच्या घरात सर्वांसोबतच भांडताना दिसते.
विकेंडच्या वारमध्ये अनिल कपूर हे शिवानीला खडेबोल सुनावताना दिसले होते. शिवानी दुसऱ्यांना चुकीचे बोलते आणि तिला कोणीही चुकीचे बोलले की, सहन होत नाही असे अनिल कपूर यांनी म्हटले. शिवानी ही बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त खेळाडू होताना दिसतंय. यावेळीच्या विकेंडच्या वारमध्ये धमाका