Bigg Boss 3 OTT: अरमान मलिकवर बलात्काराचे आरोप, कृतिकाला माहिती होतं सत्य? काय आहे धक्कादायक प्रकरण
Bigg Boss 3 OTT: अरमान मलिक याच्यावर 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप, कृतिकाला माहिती होतं सत्य? अखेर दुसऱ्या पत्नीने सोडलं मौन..., सध्या सर्वत्र अरमान मलिक आणि त्याच्यावर असलेल्या बलात्कारासारख्या गंभीर आरोपांची चर्चा...
Bigg Boss OTT 3: अभिनेते आणि होस्ट अनिल कपूर यांचा ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन 3 संपला आहे. शुक्रवारी अनिल कपूर यांनी विजेत्याची घोषणा केली. सना मकबूल हिने ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची ट्रॉफी जिंकली आहे. कृतिका मलिक, रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजी हे टॉप 5 मध्ये पोहोचले. पण कृतिका शोमध्ये शेवटपर्यंत टिकू शकली नाही. पण कृतिका वादग्रस्त शोमधील दमदार स्पर्धक म्हणून समोर आली. काही लोकांना मात्र कृतिकाचं टॉप 5 पर्यंत पोहोचणं योग्य वाटलं नाही. नुकताच, कृतिका हिने टॉप 5 पर्यंतचा प्रवास आणि पती अरमान मलिक याच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर मोठं वक्तव्य केलं आहे.
कृतिका मलिक ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये टॉप 5 पर्यंत पोहोचली. पण शोमध्ये टॉप 5 पर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी कृतिका योग्य होती? असा प्रश्न कृतिका हिला विचारण्यात आला. यावर कृतिका म्हणाली, ‘कोण काय विचार करतोय, तो त्या व्यक्तीचा भाग आहे. इतर स्पर्धकांचे जे विचार आहेत, त्याला मी काहीही करू शकत नाही. मी जशी खऱ्या आयुष्यात आहे, तशीच मी शोमध्ये देखील होती. पात्र होती म्हणून टॉप 5 पर्यंत पोहोचली..’
View this post on Instagram
पुढे अरमान याच्यावर असलेल्या 11 वर्षीय मुलीच्या बलात्काराच्या आरोपांबद्दल कृतिका म्हणाली, ‘मला याठिकाणी खासगी आयुष्यावर काहीही बोलायचं नाही. यावर मला काहीही बोलण्याची गरज देखील नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने जो काही निर्णय घेतला असेल तो योग्य आहे..’ असं कृतिका म्हणाली.
सांगायचं झालं तर, सोशल मीडिया स्टार अरमान मलिक याने दोन पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिक यांच्यासोबत ‘बिग बॉस ओटीटी 3’ च्या घरात प्रवेश केला. ज्यामुळे तिघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चे तुफान रंगल्या. पायल मलिक पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडली. त्यानंतर अरमान घराबाहेर पडला आणि कृतिका टॉप 5 पर्यंत पोहोचली पण ट्रॉफी जिंकू शकली नाही…
सोशल मीडियावर देखील मलिक कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पायल मलिक ही अरमान याची पहिली पत्नी आहे. तर पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अरमान याने कृतिका हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांना चार मुलं आहे. मलिक कुटुंब कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतं.