25 लाख मिळताच अभिनेत्री विसरली बॉयफ्रेंडला, नेटकऱ्यांचा संताप, थेट ट्रोल करत..

अभिनेत्री सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता ठरलीये. विशेष म्हणजे सना मकबूल हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटीची विजेता झाल्यानंतर सर्वांना अगोदर मोठा धक्का बसला होता. आता तिने असे काही विधान केले की, लोक हैराण झाले आहेत.

25 लाख मिळताच अभिनेत्री विसरली बॉयफ्रेंडला, नेटकऱ्यांचा संताप, थेट ट्रोल करत..
Sana Makbul
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 2:52 PM

बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले झाला असून सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. बिग बॉस जिंकल्यानंतर सना मकबूल ही तूफान चर्चेत आहे. मात्र, सना मकबूल हिने केलेल्या विधानानंतर लोक आता तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर लोकांनी सना मकबूल हिच्या विरोधात सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत. बिग बॉस ओटीटी 3 जिंकल्यानंतर सना मकबूल हिला 25 लाख रूपये मिळाले आहेत. सना मकबूल ही गेल्या काही वर्षांपासून श्रीकांत बुरेड्डी याला डेट करतंय. विशेष म्हणजे तो फिनालेच्या दिवशीही पोहोचला होता.

श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत जिंकल्यानंतर सना मकबूल ही फोटो काढताना देखील दिसली होती. फक्त श्रीकांत बुरेड्डी हाच नाही तर सना मकबूल हिचे कुटुंबिय देखील यावेळी उपस्थित हेते. श्रीकांत बुरेड्डी याच्या गाडीमध्येच बसून फिनाले जिंकल्यानंतर सना मकबूल ही घरी निघाली. यावेळी पुढच्या सीटवर सना मकबूल ही बसली होती तर मागच्या सीटवर श्रीकांत बुरेड्डी हा बसला होता.

यावेळी श्रीकांत बुरेड्डी याला विचारण्यात आले होते की, सना मकबूल आणि तुम्ही लग्न कधी करणार आहात? यावर लाजत श्रीकांत बुरेड्डी याने म्हटले होते की, लवकरच…आणि तुम्हाला देखील त्याबद्दल सांगू…यानंतर तूफान चर्चा रंगताना दिसली की, श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत लवकरच सना मकबूल ही लग्न करणार आहे.

सना मकबूल हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. मात्र, या मुलाखतीमध्ये सना मकबूल ही हैराण करणारे खुलासे करताना दिसली. सना मकबूल हिचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले. सना मकबूल हिला विचारण्यात आले की, श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत लग्न कधी करणार आहे?

यावर सना मकबूल ही थेट म्हणाली की, कोण श्रीकांत? पुढे सना मकबूल म्हणाली की, मी आणि श्रीकांत बुरेड्डी फक्त मित्र आहोत. श्रीकांत बुरेड्डी हा माझी सपोर्ट सिस्टम आहे. त्याने मला नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलाय. श्रीकांत बुरेड्डी हा कायमच माझा बेस्ट बडी असेल. सनाच्या या विधानानंतर लोक तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.