AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!

भाषावादाने नाराज झालेल्या प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी घरात मराठी गाणे वाजवण्यात आले होते.

Bigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात वाजले ‘झिंगाट’ गाणे!
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:45 AM

मुंबई : दरवर्षी प्रमाणेच ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss) पर्वदेखील भलत्याच वादामुळे चर्चेत आले आहे. तसे बघायला गेले तर, ‘बिग बॉस’ आणि ‘वाद’ हे समीकरण काही नवे नाही. दरवर्षी काहीना काही वादंग या घरात माजत असतात. यावेळी जान कुमार सानूच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ‘मराठीची चीड’, येते म्हणणाऱ्या जान विरोधात अवघा महाराष्ट्र एकवटला होता. या प्रकरणी कलर्स वाहिनी आणि जान सानूने माफिदेखील मागितली. यानंतर ‘बिग बॉस’च्या घरात चक्क ‘झिंगाट’ गाणे  (Zingaat Song) वाजवण्यात आले.(Bigg Boss played Zingaat Song After Jaan kumar Sanu’s controversial statement)

भाषावादाने नाराज झालेल्या प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी घरात मराठी गाणे वाजवण्यात आले होते. लोकप्रसिद्ध ‘झिंगाट’ गाणे लावून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याची कुजबुज प्रेक्षकांमध्ये होती. मात्र, या गाण्यावर स्पर्धकांनी धमाल नृत्य करत आपल्या दिवसाची ‘झिंगाट’ सुरुवात केली.

सकाळी आलार्म म्हणून वाजते गाणे

सकाळी सकाळी गाणे वाजवून स्पर्धकांना झोपेतून जागे करण्याची प्रथा ‘बिग बॉस’च्या घरात फार आधीपासून सुरू आहे. घड्याळ किंवा आलार्म नसलेल्या या घरात ‘बिग बॉस’ गाणे वाजवून स्पर्धकांना जागे करतात. दररोज वेगवेगळी गाणी वाजवली जातात. या गाण्यांवर नृत्य करत स्पर्धकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करायची असते. ‘बिग बॉस’च्या घरात तशी नेहमी हिंदी गाणीच वाजताना दिसतात, मात्र, नुकत्याच झालेल्या वादानंतर घरात चक्क मराठी गाणे वाजवण्यात आले.(Bigg Boss played Zingaat Song After Jaan kumar Sanu’s controversial statement)

जान कुमार सानूचे वादग्रस्त वक्तव्य

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.(Bigg Boss played Zingaat Song After Jaan kumar Sanu’s controversial statement)

जानला मराठी येत नाही : रिटा भट्टाचार्य

जानची आई रिटा भट्टाचार्य यांनी एका वेबसाईटला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मुलाचा बचाव करत रिटा म्हणाल्या, ‘राहुल आणि निक्की कार्यक्रमात मराठीत बोलत होते. जानला मराठी येत नसल्याने ते दोघे काय बोलत होते हे त्याला समजले नाही. त्यामुळे त्याने निक्कीला, तू मराठीत बोलू नको, असे सांगितले. कारण, राहुल-निक्की त्याच्याविरूद्ध बोलत आहेत, असे जानला वाटले.’

‘लोकांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि नंतर निर्णयावर यावे, अशी माझी इच्छा आहे. आम्ही महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान कसा करू शकतो? आम्ही गेल्या 35 वर्षांपासून महाराष्ट्रात राहत आहोत. या राज्याने जानचे वडील कुमार सानू यांना खूप प्रेम आणि आदर दिला आहे. मात्र, आता निर्माण झालेल्या या वादामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे’, असे त्या म्हणाल्या.

(Bigg Boss played Zingaat Song After Jaan kumar Sanu’s controversial statement)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.