Bigg Boss 16 Finale : ‘तू मराठा माणसासारखा खेळलास’, खुद्द बिग बॉसकडून शिव ठाकरे याचं कौतुक

| Updated on: Feb 11, 2023 | 8:45 AM

'तू मराठा माणसासारखा खेळलास', बिग बॉसने कौतुक केल्यानंतर शिव ठाकरे म्हणाला 'आई शपथ...', पाहा शिव याचा खास व्हिडीओ.... शिवला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला...

Bigg Boss 16 Finale : तू मराठा माणसासारखा खेळलास,  खुद्द बिग बॉसकडून शिव ठाकरे याचं कौतुक
शिव ठाकरे
Follow us on

Bigg Boss 16 Finale : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16 ) शोची ट्रॉफी कोण घेवून जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. चाहते त्यांच्या आवडीच्या स्पर्धकाला विजेता करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बिग बॉस १६ शोचा अंतिम क्षण प्रचंड खास असणार आहे. आतापर्यंत बिग बॉसचे अनेक शो झाले पण बिग बॉस १६ ऐतिहासिक सीझन ठरला आहे. सुरुवातील प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी बिग बॉस १६ काही प्रमाणात अपयशी ठरला, पणनंतर सर्वत्र शोची चर्चा होती. बिग बॉस १६ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बॉसने शिव ठाकरे याच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. घरातील दरमदार स्पर्धकांपैकी एक स्पर्धक म्हणून शिव ठाकरे (shiv thakare) याची ओळख आहे. शिवचं बिग बॉससोबतच अभिनेता सलमान खान याने देखील कौतुक केलं आहे.

बिग बॉसने शिव ठाकरे याची एक एव्ही दाखवली. एव्ही दाखवत बिग बॉस म्हणाले, शिव ठाकरे एकमेव स्पर्धक आहे, जो दोन बिग बॉस सीझनच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. पुढे बिग बॉस म्हणाले, ‘काही लोकं मनाने खेळतात, तर काही विचार करुन डोक्याने खेळतात, पण शिव एकच असा स्पर्धक आहे जो मनाने आणि विचार करुन खेळतो.’ (shiv thakare in top 5)

 

 

एवढंच नाही तर, शिव हा मंडळाचा जीव आहे असं देखील बिग बॉस म्हणाले. याठिकाणी अनेक लोकं होती पण त्यांना चालवणारा शिव ठाकरे होता. मराठा ऐकल्यावर त्यांची वीरता आठवते. वीर मराठ्यांप्रमाणे शिव कोणालाही न घाबरता योग्य प्रकारे चौकटीत खेळला. बिग बॉस यांनी केलेलं कौतुक ऐकून शिव ठाकरे भावुक झाला.

बिग बॉसने कौतुक केल्यानंतर शिव ठाकरे ‘आई शपथ…’ असं म्हणाला. शिवाय ‘बिग बॉस तुम्ही माझे गॉड फादर आहात…’ असं देखील शिव ठाकरे म्हणाला. सध्या शिवचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवचं बिग बॉसने केलेलं कौतुक ऐकून चाहते देखील प्रचंड आनंदी असल्याचे दिसले. (bigg boss 16 today full episode youtube)

बिग बॉस 16 मधील शिवच्या प्रवासाची एक झलक दाखवल्यानंतर उपस्थित असलेले प्रेक्षक जोर-जोरात ओरडू लागले. पुढे शिव म्हणाला, ‘बिग बॉस तुम्ही सिनेमाच तयार केला आणि मला हिरो केलं.’ आनंदामध्ये शिवने अनेकदा मंचावर डोक टेकवत आभार मानले. बिग बॉस तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तू दाखवून दिलं आहेस. असं देखील बिग बॉस म्हणाले.