Bigg Boss 15 | बिग बॉसचे जय भानुशालीसोबत स्पेशल कॉन्ट्रॅक्ट, 10 आठवडे होणार नाही एलिमिनेट !
छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करणार तसेच अभिनेता जय भानुशालीचे काल म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात आगमन झाले. शोचा होस्ट सलमान खानने त्याला वैयक्तिकरित्या जयला बिग बॉसच्या घरात नेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय या हंगामातील सर्वात महागडा स्पर्धक आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक तसेच अभिनेता जय भानुशालीचे काल म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी बिग बॉसच्या घरात आगमन झाले. शोचा होस्ट सलमान खानने स्व:ता जयला वैयक्तिकरित्या बिग बॉसच्या घरात नेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय या हंगामातील सर्वात महागडा स्पर्धक आहे. या लोकप्रिय टीव्ही होस्टला ‘सर्वाधिक पैसे घेणारा स्पर्धक म्हटले जाऊ शकते. वास्तविक पाहता जय या शोमध्ये जाणार हे शेवटच्या क्षणी ठरले.
अगदी शेवटच्या क्षणी घेतला गेला निर्णय
जय बिग बॅसच्या घरामध्ये जाणार हा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी घेण्यात आला. बिग बॉसच्या (Big Boss) घरात एंट्री करून जयने बिग बॉसच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला. यापुर्वी देखील जय अनेक वेळा बिग बॅसच्या घरामध्ये आला आहे. पण तो फक्त स्पर्धकांसोबत काही मनोरंजक खेळ खेळण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आव्हाने आयोजित करण्यासाठी . पण स्पर्धक म्हणून त्याने पहिल्यांदाच घरात प्रवेश केला आहे.वास्तविक, बिग बॉसच्या या शोमध्ये दरवर्षी काही स्पर्धक शेवटच्या क्षणी प्रवेश करतात. बिग बॉस 14 मध्येसुद्धा रुबिना दिलीक आणि तिचा पती अभिनव (रुबीना दिलीक आणि अभिनव शुक्ला) यांनचा शेवटच्या बिग बॅसच्या घरात प्रवेश देण्यात आला होता.
अहिंसेच्या मार्गाने जिंकायचा आहे खेळ
कालच्या एपिसोडमध्ये जयला बिग बॉस 15 च्या घरात प्रवेश मिळाला. त्याने त्याचे परफॉर्मन्स दिल्यानंतर थेट सलमान खानची भेट घेतली. त्यानंतर दबंग खानने जयला जंगलासह, संपूर्ण घराच्या सफरीवर घेऊन गेला. सलमान खानशी बोलताना जय म्हणाला की “त्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे की पहिल्या दोन आठवड्यांत त्याला शोमधून बाहेर काढावे आणि जर तसे झाले नाही तर त्याने शो संपेपर्यंत बिग बॉसच्या घरात राहावे. . शक्ती मिळवा जयला हा शो जिंकायचा आहे “. हा शो त्याला अहिंसेच्या मार्गाने जिंकायचा आहे ही गोष्ट त्याने आधीच सांगितली. तरी जर त्याच्याशी कोणी हिंसा अर्थात शारिरीक मारामारी केली तर तो त्या व्यक्तीला ठार करेल आणि शोमधून बाहेर जाईल असे देखील ही त्याने स्पष्ट केले आहे .
आता पर्यंत जिंकला आहे एक रिअॅलिटी शो
जय भानुशालीेने या आधी ही एक रिअॅलिटी शो जिंकला आहे. जयची पत्नी माही विजसोबत त्याने नच बलिये मध्ये भाग घेतला आणि शो देखील जिंकला देखील. बिग बॉस हा रियालिटी शो पूर्णपणे वेगळा असला तरी हा रियालिटी शो तो जिंकेल अशी अशा त्याला आहे.
जयची लाडकी मुलगी तारा त्याला शोधतेय
एकीकडे जय भानुशालीनी बिग बॉसमध्ये भाग घेतला आहे. जयला घराच्या आत जाऊन काही तास झाले आहेत, पण या काळातच अभिनेत्याची लाडकी मुलगी तारा त्याची आठवण काढू लागली आहे. यावेळी जय भानुशालीची मुलगी ताराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, तारा संपूर्ण घरात जय-पापा म्हणून शोधताना दिसत आहे.
इतर बातम्या
शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…