गुणरत्न सदावर्ते याचा दाऊद इब्राहिमबद्दल ‘तो’ हैराण करणारा खुलासा, मोठी खळबळ, थेट म्हणाला, सरकार…
'बिग बॉस सीजन 18'ला सुरूवात झालीये. सीजनला सुरूवात होऊन अवघे काही दिवस झाले नाहीत तोवरच बिग बॉसच्या घरात धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे आता एक अत्यंत मोठा खुलासा बिग बॉसच्या घरात करण्यात आलाय. यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’नंतर आता बिग बॉस 18 ला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे अनेक दिग्गज कलाकार हे बिग बॉस सीजन 18 मध्ये धमाल करताना दिसत आहेत. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील यंदा बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गुणरत्न सदावर्ते यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बिग बॉस 18 ला सलमान खान हा त्याच्या तब्येतीमुळे होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, सलमान खान हाच बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. सलमान खानचा बिग बॉसच्या घरातील अंदाज लोकांना प्रचंड आवडतो.
बिग बॉस सीजन 18 ला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झालेले असताना घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे घरात जोरदार हंगामे करत आहेत. हेच नाही तर त्यांनी बिग बॉसच्या निर्मात्यांचा निर्णय देखील मान्य केला नसल्याचे बघायला मिळतंय. थेट सलमान खानसोबतही पंगा घेतला. दाऊद इब्राहिमबद्दलही थेट मोठे भाष्य बिग बॉसच्या घरात करताना गुणरत्न सदावर्ते हे दिसले आहेत.
बिग बॉसने म्हटले की, जेलमध्ये असलेले सदस्यांना बाहेर देऊ द्यायचे असेल तर तुम्ही ठरवा की, त्यांना बाहेर काढून जेलची शिक्षा कोणाला द्यायची. मग बिग बॉसने करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांना एक विशेषाधिकार दिला. तिघांना मिळून घरातील एका स्पर्धकाचे नाव ठरवाचे ज्याला पुढील जेलची शिक्षा द्यायची. तिघांनी मिळून गुणरत्नचे नाव घेतले.
मात्र, यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा चांगलाच संताप हा बघायला मिळाला. गुणरत्न सदावर्ते यांनी ठणकावून सांगितले की, मी जेलमध्ये जाणार नाही. मी या आठवड्यात नॉमिनेशमध्ये जाईल पण जेलमध्ये नाहीच. गुणरत्न सदावर्ते तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट बिग बॉसच्या निर्मात्यांनाच धमकी देऊन टाकली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मला कोणीही जेलमध्ये टाकू शकत नाही. सरकार मला घाबरते.
दाऊद इब्राहिम मला घाबरतो….काहीही झाले तरीही मी जेलमध्ये जाणार नाही. यानंतर बिग बॉसने सांगितले की, गुणरत्न सदावर्ते तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. मला जेलमध्ये कोणीच टाकू शकत नाही आणि मी जेलमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बिग बॉसनेही माघार घेतल्याचे बघायला मिळाले. आता विकेंडच्या वारला सलमान खान गुणरत्न सदावर्तेला काय बोलतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.