Raqesh Bapat | ‘प्रकृती थोडी गंभीर…’, आयसीयूमध्ये असलेल्या राकेश बापट याने प्रकृतीबद्दल दिली मोठी माहिती
परदेशातील रुग्णालयात सुरु आहेत राकेश बापट याच्यावर उपचार... अभिनेत्याने स्वतःचा व्हिडीओ पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : अभिनेता राकेश बापट याने ‘सात फेरे’, ‘होंगे जुदा ना हम’, ‘कुबूल है’, ‘ये है आशिकी’, ‘बहु हमारी रजनीकांत’ आणि ‘इश्क में मरजावां’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर अभिनेत्याने राज्य केलं. फक्त मालिकाच नाही तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण आता अभिनेता त्याची मालिका किंवा सिनेमामुळे नाही तर, प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे. शिवाय चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.
अभिनेत्याने सुरुवातील हाताला ड्रिप लावल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता अभिनेत्याने स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने हेल्थ अपडेट देखील दिली आहे. दुबई याठिकाणी शुटिंग करत असताना अचानक अभिनेत्याची प्रकृती खालावली. सध्या अभिनेत्यावर दुबईतील रुग्णालयात सुरु आहेत.
रुग्णालयातून व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, प्रकृतीबद्दल सांगू न शकल्यामुळे अभिनेत्याने सुरुवातीला चाहत्यांची माफी मागितली. ‘मी दुबईमध्ये शुटिंग करत आहे. शहरातील उष्णतेमुळे माझी प्रकृती खालावली. उष्माघात, ताप, आणि रक्तदाबाची समस्या निर्माण झाली. ज्यामुळे माझी प्रकृती खालावली. मी UAE मध्ये ICU मध्ये आहे आणि सुरक्षित हातात आहे. मला आशा आहे की मी लवकरच कामावर परतेन आणि भारतात येईन.’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार.’ असं देखील अभिनेता म्हणाला. अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र राकेश बापट आणि त्याच्या प्रकृतीची चर्चा रंगत आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता असल्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
राकेश बापट फक्त त्याच्या खासगी नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. बिग बॉसमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली. पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
शमिता शेट्टी हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राकेश पोस्ट करत म्हणाला, ‘मला सर्वांना सांगायचं आहे की, मी आणि शमिता आता विभक्त झाले आहोत. ऐकून तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही आम्हा दोघांवर पूर्वीप्रमाणे प्रेम कराल अशी आशा करतो…’ असं राकेश म्हणाला होता. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं पण राकेश आणि शमिता यांचं नातं फार काळ टिकलं नाही.