‘बिग बॉस’वरून अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला; सुजला चेहरा, डोळ्यांवर जबर मार

बिग बॉस तमिळची माजी स्पर्धक आणि दाक्षिणात्य अभिनेत्री वनिता विजयकुमार हिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पार्किंग परिसरात एका व्यक्तीने वनिताच्या चेहऱ्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वनिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने तिचा फोटो पोस्ट केला आहे.

'बिग बॉस'वरून अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला; सुजला चेहरा, डोळ्यांवर जबर मार
Vanitha VijaykumarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 10:48 AM

चेन्नई : 27 नोव्हेंबर 2023 | दाक्षिणात्य अभिनेत्री आणि ‘बिग बॉस तमिळ’ या शोची माजी स्पर्धक वनिता विजयकुमारबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. वनितावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात वनिताला बरीच दुखापत झाली असून तिचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. त्याचा फोटो वनिताने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिची ही अवस्था पाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा हल्ला कसा आणि कधी केला, याबद्दलची माहिती वनिताने तिच्या पोस्टद्वारे दिली आहे.

‘माझ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दलची ही पोस्ट मी अत्यंत धाडसाने लिहित आहे. बिग बॉस तमिळ हा टीव्हीवरील फक्त एक गेम शो आहे. त्यामुळे माझ्यावर होणारा हल्ला चुकीचा आहे. देव जाणो, माझ्यावर कोणी इतका निर्दयी हल्ला केला.. तथाकथित प्रदीप अँटनी समर्थक. मी बिग बॉस तमिळ 7 चा रिव्ह्यू संपवला आणि रात्रीचं जेवण जेवले. जेवल्यानंतर मी कारच्या दिशेने निघाली. बहीण सौम्याच्या घराच्या पार्किंग परिसरात मी माझी गाडी पार्क केली होती. तिथे अंधार होता आणि अचानक एक व्यक्ती समोर येऊन म्हणाला.. रेड कार्ड कुडुक्रींगला, नी सपोर्ट वेरा. त्यानंतर तो माझ्या चेहऱ्यावर जोरजोरात मारू लागला. मी बचावासाठी ओरडत होते आणि त्याने तिथून पळ काढला. माझ्या चेहऱ्यावरून रक्त येत होतं आणि मी मदतीसाठी ओरडत होते’, असं तिने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

घटनेविषयी वनिताने पुढे सांगितलं, ‘जवळपास तासभर माझ्याजवळ कोणीच नव्हतं. मी माझ्या बहिणीला खाली बोलावलं आणि तिने माझ्याकडे पोलिसांत तक्रार दाखल करण्याची विनंती केली. पण या प्रक्रियेवर माझा विश्वास नसल्याचं मी तिला म्हणाले. मी स्वत:वर उपचार करून घेतले. पण माझ्यावर कोणी हल्ला केला, हे मी जाणू शकले नाही. हल्लेखोर मला मारल्यानंतर वेड्यासारखा हसत होता. त्याचा तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. मी सध्या प्रत्येक गोष्टीपासून ब्रेक घेतेय. कारण मी सध्या स्क्रीनवर चांगली दिसण्याच्या स्थितीत नाही. जे लोक त्रस्त असलेल्या लोकांचं समर्थन करतात, त्यांच्यापासून धोका फक्त एक फूट लांब आहे.’

‘बिग बॉस तमिळ 7’चा स्पर्धक प्रदीपने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रदीपने सोशल मीडियावर त्याच्यात आणि वनितामध्ये झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. वनितासोबत नेमकं काय घडलं, याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. वनिताची मुलगी जोविका, बिग बॉस तमिळची स्पर्धक आहे. जोविकाने प्रदीपच्या वागणुकीवर तक्रार केली होती आणि त्याला ‘रेड कार्ड’ दाखवला होता. त्यानंतर प्रदीपला लगेचच शोमधून बाहेर काढण्यात आलं. म्हणूनच प्रदीपच्या तथाकथित समर्थकाने हल्ला केल्याचा संशय वनिताने व्यक्त केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.