‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; टीकेनंतर युजरला म्हणाली..
'बिग बॉस तमिळ'च्या पहिल्या सिझनमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ओविया हेलन सध्या तिच्या एमएमएस व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओवरून खिल्ली उडवणाऱ्या एका युजरने ओवियाने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
‘बिग बॉस तमिळ’च्या पहिल्या सिझनमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ओविया हेलन सध्या तिच्या इंटिमेट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ओवियाची एक क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं चाहते म्हणत आहेत. आता ओवियाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने थेट या चर्चांबद्दल काही म्हटलं नसलं तरी इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती ‘फिंगर्स क्रॉस्ड’ करताना दिसून येत आहेत. ओवियाने हा फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिला तिच्या व्हायरल व्हिडीओविषयी विचारलं. एका युजरने तिची खिल्ली उडवत विचारलं, “तुझ्या व्हिडीओचा मोठा व्हर्जन पाठवशील का?” संबंधित युजरला ओवियाने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
व्हिडीओचा पुढील भाग दाखवण्याची मागणी करणाऱ्या युजरला उत्तर देत ओवियाने लिहिलं, ‘नेक्स्ट टाइम ब्रो’ (पुढच्या वेळी भावा). युजरला सुनावण्याच्या फंद्यात न पडता ओवियाने दिलेलं हे उपरोधिक उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ओवियाचा एमएमएस लीक झाला होता. तिच्या अनेक चाहत्यांनी व्हिडीओवरून विविध प्रश्न उपस्थित केले. हा व्हिडीओ खरंच तिचा आहे का, हा ओवियावरील सायबर अटॅक आहे असं काहींनी लिहिलं होतं.
View this post on Instagram
कोण आहे ओविया?
ओविया ही हेलन नेल्सन म्हणूनही ओळखली जाते. तिने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतल्या चित्रपटांमध्ये काम केलंय. ओविया ही मूळची केरळमधील थ्रिसुर इथली आहे. 2007 मध्ये तिने ‘कांगारू’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने पृथ्वीराज सुकुमारनसोबत काम केलं होतं. त्यानंतर तिने ‘पुथिया मुखम’ आणि ‘अपूर्वा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ओवियाने ‘नालई नामधे’ या चित्रपटाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
‘बिग बॉस तमिळ’च्या पहिल्या सिझनमध्ये ओविया स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र आरोग्याच्या समस्यांमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. बिग बॉसच्या घरात ओविया प्रामाणिकपणे तिचा खेळ खेळली, असं म्हणत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं. याच शोमध्ये ओवियाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. ओविया योगी बाबूसोबत ‘बूमर’ या चित्रपटात नुकतीच झळकली होती.