सलमान खान 25 वर्षीय तरुणीसोबत करणार लग्न? म्हणाला, ‘तुझी आई आणि मी…’
Salman Khan Marriage: 'या' 25 वर्षीय तरुणीसोबत सलमान खान याच्या लग्नाच्या चर्चा, वयाच्या 58 व्या वर्षी भाईजान अडकणार लग्नबंधनात? तिला म्हणाला, 'तुझी आई आणि मी...', सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...
Salman Khan Marriage: अभिनेता सलमान खान याला कायम विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे भाईजान लग्न कधी करणार? आजही सलमान खान याला अनेक महिला लग्नासाठी विचारत असतात. आता देखील सलमान खान याला एका 25 वर्षीय अभिनेत्रीने लग्नासाठी मागणी घातली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री चाहत पांडे आहे.
‘बिग बॉस 18’ शोमधील चाहत दमदार स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात चाहत कायम लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसते. अशात नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सलमान खान सर्व स्पर्धकांसमोर चाहत हिची खिल्ली उडवताना दिसला.
View this post on Instagram
सलमान खान चाहत हिला म्हणतो, ‘घरात आल्यापासून तू सतत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसते. तर तुला कशा मुलासोबत लग्न करायला आवडेल? आणि तुझ्या अपेक्षा काय आहेत?’ एवढंच नाही तर, तुला बिग बॉसच्या घरातील पुरुषांमध्ये असलेले गुण सांगायचे आहेत.
यावर करणवीरचं नाव घेच चाहत म्हणते, ‘करण सारखा फिटनेस फ्रिक मुलगा मला हवा आहे. जो स्वतःची काळजी घेईल. माझ्या पार्टनरचे केल विवयन सारखे असायला हवेत…’ पुढे करण म्हणतो, ‘सलमान खान सर मधील कोणते गुण तुला आवडतात?’
सलमान खान बद्दल चाहत म्हणते, ‘सलमान सर तुम्हीच माझ्यासोबत लग्न करा…’, यावर सलमान खान म्हणतो, ‘तुझ्या ज्या अपेक्षा आहेत. त्यामधील एकही गुण माझ्यामध्ये नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझी आई आणि माझं बिलकूल पटणार नाही…’ असं देखील सलमान खान म्हणाला.
सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सेलिब्रिटी अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान एकटाच आहे.
अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान रिलेशनशिपमध्ये होता. आज सलमान – ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील दोघांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र रंगत असतात.