Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांत 5 चित्रपट, 2 सुपरहिट तर 3 ब्लॉकबस्टर.. ‘जवान’च्या दिग्दर्शकाची कमाल

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय. या चित्रपटामुळे दिग्दर्शक अटली चांगलाच चर्चेत आला आहे. 36 वर्षीय अटलीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूडमध्ये कमाल केली आहे.

| Updated on: Sep 16, 2023 | 2:15 PM
दक्षिणात्य चित्रपट सृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत सध्या एकाच दिग्दर्शकाची जोरदार चर्चा सुरू आहे. जे काम मोठमोठ्या दिग्दर्शकांना करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, तीच कमाल याने अवघ्या 36व्या वर्षी करून दाखवली आहे. या दिग्दर्शकाने आत्तापर्यंत पाच चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय, त्यापैकी दोन सुपरहिट आणि तीन ब्लॉकबस्टर ठरले आहेत .

1 / 7
हा दुसरा तिसरा कोणी नसून शाहरुख खानच्या सुपरहिट 'जवान' या चित्रपटाचा दिग्दर्शक अटली कुमार आहे. 'जवान'ला फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 'जवान'च्या आधी अटलीने चार जबरदस्त चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. हे चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.

2 / 7
अटली कुमारने त्याच्या करिअरमध्ये बहुतांश चित्रपट साऊथ सुपरस्टार थलपती विजयसोबत केले आहेत. त्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. 2013 मध्ये 'राजा रानी' या चित्रपटाच्या माध्यमातून अटलीने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. यामध्ये आर्या आणि नयनतारा मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 84 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

3 / 7
2016 मध्ये प्रदर्शित झालेला अटलीचा 'थेरी' हा चित्रपट सुद्धा ब्लॉकबस्टर होता. यामध्ये थलपती विजय मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत समंथा रूथ प्रभू आणि ॲमी जॅक्सन यांच्याही भूमिका होत्या.

4 / 7
'थेरी'नंतर 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'मर्सल' हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला. यामध्ये पुन्हा एकदा अटलीने थलपती विजयसोबत काम केलं. तोपर्यंत अटली आणि थलपती विजयची जोडी हिट ठरली होती.

5 / 7
यानंतर अटलीचा 'बिगिल' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये पुन्हा एकदा अटलीने थलपती विजयसोबत काम केलं. या चित्रपटात नयनतारा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती.

6 / 7
सध्या त्याचा जवान हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. अवघ्या 36 वर्षीय अटली कुमारने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे.

7 / 7
Follow us
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.