‘सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण उलगडलं असतं, जर…’, Ex-DGP गुप्तेश्वर पांडे यांचं थक्क करणारं वक्तव्य

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या कडून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा

'सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण उलगडलं असतं, जर...', Ex-DGP गुप्तेश्वर पांडे यांचं थक्क करणारं वक्तव्य
ड्रग प्रकरणातील आरोपींच्या आवाजाच्या टेस्टला न्यायालयाची परवानगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 2:28 PM

Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (actor sushant singh rajput) च्या आत्महत्येचा मुद्दा दोन वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर कूपर रुग्णालयातील कर्मचारी मॉर्चरी सर्वेंट रूपकुमार शाह (Mortuary Servant Roopkumar Shah) यांनी सुशांत सिंग प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्याच होती असा दावा शाह यांनी केला आहे. शाह यांच्या दाव्यानंतर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठा खुलासा केला आहे.

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी आरोप लावले आहेत. पांडे म्हणाले, ‘तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी बिहारमधून आलेल्या पोलिसांना सहकार्य केलं नाही. मुंबई पोलिसांकडून होणारा दुजाभाव पाहाता लक्षात आलं याठिकाणी काही तरी लपत आहे.’

माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे पुढे म्हणाले, ‘मला आणि माझ्या टीमला तपास करण्यासाठी पर्याप्त वेळ दिला नाही. तपासासाठी आलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याला देखील नजरबंद करण्यात आलं. तेव्हा जर मला १५ दिवसांचा कालावधी दिला असता, तर सर्व सत्य समोर आलं असतं.’ असं देखील ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० मध्ये राहत्या घरी गळफान घेवून आत्महत्या केली. अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्येच नाही, तर राजकारणात देखील प्रंचड खळबळ माजली. पण अद्यापही अभिनेत्याच्या आत्महत्या की हत्या? या मागील रहस्य कायम आहे.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेता सुशांतने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जिद्द आणि अभिनयाच्या जोरावर सुशांतने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. फार कमी कालावधीत अभिनेत्याचे चाहत्यांच्या मनात घर केलं. पण १४ जून रोजी गळफास घेवून अत्महत्या केली आणि आपला जीवन प्रवास संपवला.

दरम्यान, सुशांतचं निधन झाल्यानंतर शवविच्छेदगृहात घडलेला सर्व प्रकार प्रथमदर्शी शाह यांनी सांगितल्यामुळे याप्रकरणाला नवं वळण लागलं आहे. म्हणून याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.