सलमान खान – सलीम खान यांचे पुतळे जाळत आंदोलन, वडिलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर वातावरण तापलं

Salman Kham - Salim Khan: सलमान खानच्या वडिलांच्या 'त्या' वक्तव्यानंतर बिश्नोई समाजात वातावरण आणखी तापलं..., आंदोलन करत जाळले सलमान खान - सलीम खान यांचे पुतळेआणि..., सलमान खान याच्या जीवाला धोका...

सलमान खान - सलीम खान यांचे पुतळे जाळत आंदोलन, वडिलांच्या 'त्या' वक्तव्यानंतर वातावरण तापलं
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 9:27 AM

Salman Kham – Salim Khan: जो कोणी सलमान खान याची मदत करेले, त्याने आपला हिशेब करुन ठेवायचा… असं धमकी देखील गुंड लॉरेन्स बिश्नोई याने जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सांगायचं झालं तर, काळवीट शिकार प्रकरणी सलमान बिश्नोई गँग आणि समाजाच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. पण आता बिष्णोई समाजाने सलमान खान आणि वडील सलीम खान यांचे पुतळे जाळत आंदोलन केलं आहे.

सलीम खान यांच्या एक वक्तव्यामुळे बिश्नोई समाजात वातावरण तापलं आहे. सलमान खान निर्दोष आहे आणि त्याने काळवीट शिकार केली नाही… असं वक्तव्य सलीम खान यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. बिश्नोई धर्म स्थापना दिनानिमित्त काही आंदोलकांनी सलमान खान आणि सलीम खान यांचे पुतळे जाळत निषेध व्यक्त केला आहे.

जोधपूरच्या वेगवेगळ्या भागात आंदोलक जमा झाले होते. यावेळी सलीम खान यांच्या वक्तव्यावर समाजातील लोकांनी आक्षेप घेतला आहे. ‘जर सलमान खान निर्दोष आहे तर त्याला मुंबई, दिल्ली आणि जोधपूर याठिकाणी केससाठी वकिलांना गरज का भासली?’ असे प्रश्न देखील बिश्नोई समाजाकडून व्यक्त करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

सलमान खान आणि सलीम खान यांच्याविरोधात निदर्शने करत समाजातील लोकांनी पुन्हा माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच सलमानने माफी न मागितल्यास सनातन हिंदू समाज त्याच्याविरोधात आंदोलन करेल. असा इशाराही दिला.

काय म्हणाले होते सलीम खान?

सलीम खान म्हणाले होते, ‘माझ्या मुलाने कधी झुरळ देखील मारला नाही. तो काळवीटाची शिकार कशी करेल? सलमान खान याने कोणत्याच प्राण्याची शिकार केलेलीन नाही. त्याने काही चूक केली नसेल तर तो माफी का मागेल. काही कारण नसताना सतत त्याला धमक्या मिळत आहेत…’ सलीम खान यांचं वक्तव्य सर्वत्र व्हायरल झालं होतं.

जुन्या मुलाखतीतील सलमानचं वक्तव्य

एका जुन्या मुलाखतीत सलमान खान याने या प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. ‘एक घाबरलेलं हरीण मला दिसला. तेव्हा त्याला बिस्किटे खायला दिली आणि थोडे पाणी दिलं. त्यानंतर तो तेथून पळून गेला…’ असं सलमान खान म्हणाला होता. पण सध्या सलमान खान याला सतत जीवेमारण्याच्या धमक्या मिळत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.