सलमान खान अन् त्याचा संपूर्ण परिवार खोटारडा, माफी मागण्यास नकार दिल्यानंतर संतापला बिश्नाई समाज
Bishnoi Samaj on Salim Khan: सलमान खानच्या परिवाराकडून बिश्नोई समाजाबाबत दुसरा गुन्हा करण्यात आला आहे. सलमान खान याचे वडील सलीम खान यांच्यानुसार, पोलीस, वन विभाग, साक्षीदार सर्व काही खोटे आहे.
Bishnoi Samaj on Salim Khan: राष्ट्रवादी काँग्रेसचा नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमान खान माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे. सलमान खानने शिकारच केली नाही. त्याने कधी साधा कॉकरोच मारला नाही. त्यामुळे माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या या वक्तव्यानंतर बिश्नाई समाज संतापला आहे. सलमान खानच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब खोटारडे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
सलमान खानचा पूर्ण परिवार खोटरडा
बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुढिया यांनी म्हटले आहे की, सलमान खानच्या परिवाराकडून बिश्नोई समाजाबाबत दुसरा गुन्हा करण्यात आला आहे. सलमान खान याचे वडील सलीम खान यांच्यानुसार, पोलीस, वन विभाग, साक्षीदार सर्व काही खोटे आहे. पोलिसांनी कळविटचे अवशेष जप्त केले आहे. बंदूक जप्त केली आहे. सलमान खान याला शिक्षाही झाली आहे. कोर्टाने सर्व पुरावे पाहून सलमान खानला शिक्षा दिली आहे. खरंतर सलमान खान आणि त्याचा संपूर्ण परिवार खोटारडा आहे.
बिश्नोई समाजाबाबत हा दुसरा गुन्हा
सलमान खान धमकी प्रकरण हा खंडणीचा विषय असल्याचे सलीम खान यांनी म्हटले होते, त्यावर बोलताना बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुढिया यांनी म्हटले की, आमच्या समाजाला त्याचा पैसा नकोय. परंतु सलीम खान यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण समाज दुखावला गेला आहे. बिश्नोई समाजाबाबत सलमान खानच्या परिवाराने केलेला हा दुसरा गुन्हा आहे. बिश्नाई समाज 550 वर्षांपासून पर्यावरणासाठी कामे करत आहे. अनेक प्राणी या समाजाने वाचले आहे. वनसंपदा वाचवली आहे.
काय म्हणाले होते सलीम खान
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी म्हटले होते की, बिश्नोई समाज सलमानने माफी मागावी, अशी मागणी करत आहे. परंतु सलमान खानने शिकारच केली तर तो माफी का मागेल? त्याने माफी मागितली तर त्याचा अर्थ होईल, त्याने गुन्हा केला आहे, असे सलीन खान यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा…
550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम