Sonali Phogat: ‘रुख से जरा नकाब उठा दो..’; निधनाच्या काही तासांपूर्वी सोनाली फोगाट यांनी पोस्ट केला होता व्हिडीओ

निधनाच्या जवळपास 12 तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या रील व्हिडीओमध्ये त्या मोकळेपणे हसताना पहायला मिळत आहेत. या व्हिडीओत त्या एकदम फिट दिसत असून त्यानंतर काही तासांनी त्यांचं अकस्मात निधन होईल याची कल्पनाही कोणी केली नसेल.

Sonali Phogat: 'रुख से जरा नकाब उठा दो..'; निधनाच्या काही तासांपूर्वी सोनाली फोगाट यांनी पोस्ट केला होता व्हिडीओ
Sonali PhogatImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 12:53 PM

भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचं आज (मंगळवारी) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनयातून राजकारणाकडे वळलेल्या सोनाली या बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही दिसल्या होत्या. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक हरियाणामधून आदमपूर मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात लढली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मदरहूड’ या हिंदी चित्रपटात झळकलेल्या सोनाली फोगाट या सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर (TikTok Star) त्यांची खूप लोकप्रियता होती. इन्स्टाग्राम फॉलोअर्ससाठी त्या दररोज विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करायच्या. इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास 9 लाख फॉलोअर्स आहेत.

सोमवारी रात्री उशिरा त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. इन्स्टा रील्सवर विविध गाण्यांवर आपले व्हिडीओ पोस्ट करता येतात. सोनाली यांनी मोहम्मद रफींच्या ‘मेरे हुजूर’ चित्रपटातील ‘रुख से जरा नकब उठा दो मेरे हुजूर..’ या क्लासिक बॉलीवूड गाण्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा फेटा डोक्यावर बांधला होता. निधनाच्या जवळपास 12 तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या रील व्हिडीओमध्ये त्या मोकळेपणे हसताना पहायला मिळत आहेत. या व्हिडीओत त्या एकदम फिट दिसत असून त्यानंतर काही तासांनी त्यांचं अकस्मात निधन होईल याची कल्पनाही कोणी केली नसेल.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर एक हजारहून अधिक कमेंट्स असून अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बिग बॉस 13 फेम मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना हिने ‘ओम शांती’ अशी कमेंट  केली. सोनाली यांनी रील पोस्ट करण्यापूर्वी आपला एक फोटो देखील शेअर केला होता. सोनाली यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी इंस्टाग्रामवर काही स्टोरीसुद्धा पोस्ट केल्या होत्या. गुलाबी फेट्यातील त्यांच्या लूकचे काही फोटो त्यांनी स्टोरीमध्ये पोस्ट केले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.