मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार

अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर;  BMC ची पोलिसांकडे तक्रार
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 10:57 AM

मुंबई : अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार (BMC Complaint Against Sonu Sood In Police) दाखल केली आहे. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता. (BMC Complaint Against Sonu Sood In Police).

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सूदने केलेल्या अनियमित भरती, बदल आणि उपयोगकर्त्याच्या बदल्याची नोंद घेण्यासंदर्भात जुहू पोलिसांना सांगण्यात आले आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली आहे. सहा मजली इमारत परवानगी न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याची पालिकेची तक्रार आहे. सोनू सूदला याबाबत नोटीस देऊन सुद्धा बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केलीय.

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार केली आहे.

सोनू सूदची प्रतिक्रिया

याप्रकरणी सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे आणि सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत.

बीएमसीच्या तक्रारीत काय?

बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

इतकंच नाही तर बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. सिविक अथॉरिटीने सांगितलं, नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना (एमआरटीपी) कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा केला आहे. अधिकाऱ्यांच्यामते, बीएमसीने जारी केलेल्या नोटीसविरोधात सोनू सूदने मुंबईच्या सिव्हिल न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्यांना अंतरिम दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सोनू सूदला उच्च न्यायालायत याचिका करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला होता. बीएमसीच्या मते न्यायालयाने दिलेला तीन आठवड्यांचा कालावधी संपला आहे.

BMC Complaint Against Sonu Sood In Police

संबंधित बातम्या :

‘किसान’ चित्रपटात झळकणार अभिनेता सोनू सूद, बिग बी यांच्या खास शुभेच्छा!

Sonu Sood | अभिनेता ‘सोनू सूद’ राजकीय आखाड्यात उतरुन शड्डू ठोकणार!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.