Hema Malini | धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबात आजही नाराजी? महत्त्वाच्या क्षणी देखील कुटुंब का नाही येत एकत्र?

Hema Malini | धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने नाही स्वीकारलं हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना? महत्त्वाच्या क्षणी देखील कुटुंब का नाही येत एकत्र? 'मी हेमा यांच्या जागी असती असं कधीही केलं नसतं..' धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचं वक्तव्य...

Hema Malini | धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबात आजही नाराजी? महत्त्वाच्या क्षणी देखील कुटुंब का नाही येत एकत्र?
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:55 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : अभिनेते धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेली असते. धर्मंद्र यांनी विवाहित असताना देखील पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत धर्म बदलत लग्न केलं. आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. पण हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली कधीच धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबत दिसल्या नाहीत. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांचे दोन कुटुंब महत्त्वाच्या क्षणी देखील एकत्र येत नाहीत. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसंच आहे.

सोमवारी हेमा मालिनी यांचा ७५ वा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न झाला. हेमा मालिनी यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एका छताखाली आलं होतं. अभिनेत्री राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, रेखा, जया बच्चन, अभिनेता सलमान खान यांसारखे अनेक सेलिब्रिटी हेमा मालिनी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाला पोहोचले.

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या दोन्ही मुली, जावई आणि पती धर्मेंद्र देखील होते. पण अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल वाढदिवसासाठी उरस्थित नव्हते. म्हणून धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये असलेली नाराजी पु्न्हा समोर आली आहे. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या दोन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेते सनी देओल यांच्या मुलाच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या. ईशा देओल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून करण देओल याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

हेमा मालिनी यांच्याबद्दल धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं वक्तव्य

मुलाखतीत प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, ‘धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकजण स्त्रीलंपट म्हणू लागले होते. कोणी माझ्या पतीला असं का म्हणू शकतं? जेव्हा इंडस्ट्रीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी दोनदा लग्न केलं आहे. प्रत्येक अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि ते दुसरं लग्न करत आहेत…’

पुढे प्रकाश कौर म्हणाल्या, ‘धर्मेंद्र चांगले पती होवू शकले नाहीत. पण ते एक उत्तम वडील आहेत. मुलं त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. धर्मेंद्र मुलांना कधीही विसरु शकत नाहीत. हेमा कोणत्या परिस्थितीत असतील ही गोष्ट मी समजू शकतो. पण मी हेमा यांच्या जागी असती असं कधीही केलं नसतं.. मी त्यांना समजू शकते. मी देखील एक पत्नी आणि एक आई आहे… पण मी धर्मेंद्र आणि हेमा यांच्या नात्याला कधीही परवानगी देणार नाही..’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.