Video | जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट पाहून व्हाल थक्क! दमदार बॉलरचा व्हिडीओ व्हायरल
टीम इंडियासोबतच मुंबई इंडियन्सलाही मोठा धक्का बसला आहे. कारण आयपीएल 2023 मधूनही तो बाहेर पडला आहे. याशिवाय तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही खेळताना दिसणार नाही.
मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. पण क्रिकेटर्सची दुखापत ही टीम इंडियासाठी मोठी समस्या बनली आहे. टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीमच्या बाहेर आहे. तर दुसरीकडे फलंदाज ऋषभ पंतच्या कार अपघाताने टीम इंडियाची झोप उडवली आहे. आता टीमसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या जसप्रीत बुमराहला टी- 20 वर्ल्डकपच्या आधी मैदानात आणलं होतं. पण त्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही आणि त्याला पुन्हा रिहॅबसाठी पाठवण्यात आलं आहे.
2023 या वर्षाच्या सुरुवातीला बुमराहचं कमबॅक जवळपास निश्चित झालं होतं. पण मॅचच्या एक दिवस आधी त्याच्या पाठीतील वेदनांमुळे त्याला वगळण्यात आलं. आता टीम इंडियासोबतच मुंबई इंडियन्सलाही मोठा धक्का बसला आहे. कारण आयपीएल 2023 मधूनही तो बाहेर पडला आहे. याशिवाय तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही खेळताना दिसणार नाही. टीममधून बुमराह बाहेर पडल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पहा व्हिडीओ
As #JaspritBumrah is all set to miss IPL2023, Mumbai Indians can pick him as his replacement pic.twitter.com/mG897SkezJ
— sudhanshu’ (@whoshud) February 26, 2023
जसप्रीत बुमराहच्या जागी विविध नावं सुचवली जात आहेत. पण यादरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत गोलंदाजी करणारी व्यक्ती बुमराहची जागा नक्कीच घेऊ शकते, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यामध्ये शानदार गोलंदाजी करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आहे. बॉबी देओलच आता बुमराहची जागा घेऊ शकतो, अशा कमेंट्सचा वर्षाव सोशल मीडियावर होऊ लागला आहे.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपासून फक्त एक पाऊल दूर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सीरिजमधला तिसरा कसोटी इंदोरमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे स्थान निश्चित होईल.