कपिल शर्माच्या शोमध्ये सनी-बॉबी देओल झाले भावूक; म्हणाले “1960 पासून लाइमलाइटमध्ये असूनही..”

बॉलिवूड इंडस्ट्रीत देओल कुटुंबीय 1960 पासून सक्रिय आहेत. धर्मेंद्र यांच्यानंतर सनी आणि बॉबी देओल या दोघा भावंडांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांना कामच मिळत नव्हतं.

कपिल शर्माच्या शोमध्ये सनी-बॉबी देओल झाले भावूक; म्हणाले 1960 पासून लाइमलाइटमध्ये असूनही..
Sunny and Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 1:40 PM

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल या भावंडांनी हजेरी लावली. या एपिसोडचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या एपिसोडमध्ये देओल भावंडांनीही कपिल शर्मासोबत मस्करी केली. त्याचसोबत त्यांची भावनिक बाजूही पहायला मिळाली. बॉलिवूडमध्ये काम करताना देओल कुटुंबाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा, याविषयी बोलताना सनी आणि बॉबी भावूक झाले होते.

या प्रवासाबद्दल सनी देओल म्हणाला, “आम्ही 1960 पासून प्रकाशझोतात आलो पण गेल्या अनेक वर्षांत भरपूर प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला मनासारखं काम मिळत नव्हतं. नुकतंच माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर माझा ‘गदर 2’ प्रदर्शित झाला. त्यापूर्वी वडिलांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आमच्यावर देवाची इतकी कृपा झाली, यावरच विश्वास बसत नव्हता. त्यानंतर ‘ॲनिमल’ आला सर्वच काही बदललं”

हे सुद्धा वाचा

यावेळी सनीने वडिलांसोबतच्या नात्याविषयीही सांगितलं. “मी माझ्या वडिलांसोबत बसून मित्रासारखं गप्पा माराव्यात, अशी त्यांची इच्छा असते. पण मी त्यांना म्हणतो की जेव्हा मी तुम्हाला मित्रासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो, तेव्हा तुम्ही वडिलांसारखं वागायला लागता.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. यानंतर बॉबी देओल सांगतो की देओल कुटुंबीय खूप रोमँटिक आहेत. “आमचं मन भरत नाही”, असं तो म्हणतो.

2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूपच यशस्वी ठरलं होतं. आधी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर सनी देओलचा ‘गदर 2’ तुफान हिट झाला. 2023 या वर्षांतला हा सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता. ‘गदर 2’च्या आधीही सनीने काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्याचप्रमाणे बॉबी देओलने ‘ॲनिमल’मध्ये साकारलेल्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.