ही अभिनेत्री होती बॉबी देओलचं पहिलं प्रेम, या व्यक्तीमुळे नाही होऊ शकले लग्न

Bobby deol first love : अभिनेता बॉबी देओल सध्या अॅनिमल या सिनेमातील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. तो या सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत आहे. याआधी आश्रम या वेब सीरीजमुळे देखील तो हिट झाला होता. पण अनेकांना माहित नाही की बॉबी देओल एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. पण त्यांचा विवाह होऊ शकला नाही,

ही अभिनेत्री होती बॉबी देओलचं पहिलं प्रेम, या व्यक्तीमुळे नाही होऊ शकले लग्न
bobby deol love story
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 8:30 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या अॅनिमल या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही फ्लॉप झाले तर काही हिट ठरले आहेत. पण अॅनिमल सिनेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी आश्रम या वेब सीरीजमुळे देखील तो चर्चेत आला होता. बॉबी देओलने बादल, सोल्जर, बिछू अशा अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच त्याचा अॅनिमल हा सिनेमा रिलीज झाला असून तो या सिनेमात विलनच्या भूमिकेत आहे.

बॉबी देओलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तो दोन मुलांचा बाप आहे. बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या देओलशी लग्न केले होते. त्याला आर्यमन आणि धरम अशी दोन मुले आहेत.

बॉबी देओलचे कुटुंब

बॉबी देओलचे कुटुंब सहसा कुठे दिसत नाहीत. ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. पण तान्या देओलच्या आधी बॉबी देओलच्या आयुष्यात एक अभिनेत्री होती. ते त्याचं पहिले प्रेम होते. पण ते अपूर्ण राहिले.

बॉबी देओल हा नीलम म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात होता. बॉबी देओल आणि नीलम यांना लग्न करायचे होते. पण कौटुंबिक नकार मिळाल्याने दोघांचा विवाह होऊ शकला नाही. बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र या लग्नाच्या विरोधात असल्याचं म्हटले जाते.

कुटुंबाचा नकार असल्याने झाले वेगळे

कुटुंबाचा विरोध असल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2000 साली नीलमने ऋषी सेठियासोबत विवाह केला होता. पण ते लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर नीलमने 2011 मध्ये समीर सोनीशी लग्न केले होते. नीलम अभिनेत्री तर आहेच पण ती एक उत्तम ज्वेलरी डिझायनर देखील आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.