आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Aamir Khan: आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास... मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही...

आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 2:44 PM

अभिनेता आमिर खान याची पहिली पत्नी रिना दत्ता हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. पण रिना हिच्या वडिलांचं निधन का झालं? यामागचं कारण कळू शकलेलं नाही. रिना दत्ता हिच्या वडिलांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिना हिच्या कठिण काळात आमिर खान पहिल्या पत्नीच्या कुटुंबासोबत आहे. रिना हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तिने वडील पूर्वी एअर इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी होते.

वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. फक्त आमिर खानच नाही तर त्याची वृद्ध आई झीनत हुसैन या देखील रिना दत्ता हिच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही भावूक करणारे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर चाहते श्रद्धांजली वाहत आहे. सध्या सर्वत्र रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

आमिर खान आणि रिना दत्ता यांनी 1986  मध्ये गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर आमिर आणि रिना यांनी मुलगा आणि मुलीचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर देखील आमिर कुटुंबासोबत असतो.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.