आमिर खानला ‘त्या’ गोष्टीचा पश्चाताप, मोठा खुलासा करत म्हणाला, किरण रावला..
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून आमिर हा मोठ्या पडद्यापासून तसा दूर आहे. मात्र, असे असतानाही तो कायमच चर्चेत असतो. आमिर खान याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. आता आमिर खानच्या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान हा खूप जास्त निराश झाला. हेच नाही तर त्याने काही दिवस विश्रांती घेत थेट मोठ्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णयच घेऊन टाकला. आमिर खान याच्या पदार्पणाची वाट त्याचे चाहते हे सातत्याने बघताना दिसले. हेच नाही तर लाल सिंह चड्ढानंतर त्याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. या फोटोमध्ये पांढरी दाढी, पांढरे केस आणि थकलेला चेहरा आमिरचा दिसला. ज्यानंतर चाहते हैराण झाले.
लाल सिंह चड्ढानंतर आमिर खान हा परत कधीच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की, नाही याची चिंता त्याच्या चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. आता नुकताच आमिर खान याने एका मुलाखतीमध्ये थेट मोठा खुलासा केल्याचे बघायला मिळतंय. अखेर आमिर खान हा लाल सिंह चड्ढा चित्रपटाबद्दल बोलताना दिसला आणि नेमकी चूक कुठे झाली हे सांगताना देखील दिसला.
आमिर खान म्हणाला की, माझे सतत चित्रपट चांगली कामगिरी करत होते. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेला. हा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त जवळचा नक्कीच होता. करीना कपूर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खूप जास्त मेहनत चित्रपटासाठी नक्कीच घेतली. कधीच वाटले नव्हते की, हा चित्रपट फ्लाॅप जाईल.
लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर नातेवाईक आणि जवळचे मित्र मला भेटण्यसाठी देखील आले. लाल सिंह चड्ढा चित्रपटात खरोखरच काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांचे लेव्हलही मोठे आहे. मला यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागला. परंतू मला तो वेळ हवा होता. कारण नेमकी चूक कुठे झाली यावर मला विचार हा करायचा होता. हळूहळू गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि यातून बरेच काही शिकलो देखील.
मी किरण राय हिला म्हटले की, माझ्याकडून बऱ्याच मोठ्या चुका या झाल्या आहेत. हे तरी धन्यवाद आहे की, या चुका फक्त एकाच चित्रपटात झाल्या..मी खरोखरच इमोशनली खूप जास्त हर्ट झालो होतो की, चित्रपट चालला नाही. परंतू हळूहळू मी या गोष्टींचा स्वीकार केला. लाल सिंह चड्ढा फ्लाॅप गेल्यानंतर काय काय घडत होते हे सांगताना आता थेट आमिर खान हा दिसला आहे.