चित्रपट चालली तरीही घरी पैसा नाही, दहा रुपये देणेही मुश्किल, आमिर खानला अश्रू अनावर
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर खानची मुलगी इरा खान हिचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा हा पार पडला. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. आमिर खान याने नुकताच मोठा खुलासा केलाय. आमिर खानचे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमिर खानचे चित्रपट काही खास धमाका करताना दिसत नाहीत. आमिर खानचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. हेच नाही तर लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिर खान याने खुलासा केला की, लाल सिंग चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर मी तुटलो. मला काही दिवस एकटे राहायचे होते. मला कुटुंबाला वेळ द्यायचा होता, असेही सांगताना आमिर खान हा दिसला.
नुकताच आमिर खान याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना आमिर खान दिसला. आमिर खान याने आर्थिक तंगीबद्दल भाष्य केले. आमिर खान म्हणाला की, माझ्या लहानपणी शाळेची फीस ही खूप जास्त कमी होती, मात्र असे असताना देखील मी वेळेवर कधीच फीस भरू शकत नव्हतो. माझे नाव शाळेच्या बोर्डावर लिहिले जायचे.
पुढे आमिर म्हणाला, माझ्या शाळेची फीस ही फक्त 10 रूपये असूनही मी भरू शकत नव्हतो. त्यावेळी माझ्या वडिलांचे संघर्षाचे दिवस सुरू होते. लोकांना वाटायचे की, प्रोड्यूसरचा मुलगा असल्याने एकदम लग्झरी लाईफ जगत असेल. मात्र, असे अजिबातच नव्हते. माझ्या वडिलांचे त्यावेळी बाॅलिवूडमध्ये संघर्षाचे दिवस सुरू होते.
त्यांचे चित्रपट चांगलेच चालायचे. परंतू त्यांना बिझनेसची फार काही समज नव्हती. त्यांनी जास्त कर्ज घ्यायला नव्हते हवे. चित्रपट हिट झाला तरीही त्यांच्याकडे जास्त पैसे नसायचे. पुढे आमिर खान म्हणाला की, माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी डाॅक्टर किंवा इंजिनिअर व्हावे. मात्र, मी अभिनयाचे क्षेत्र निवडले. हे सर्व सांगताना आमिर खान हा ढसाढसा रडताना देखील दिसला.
आमिर खानचे वडील फिल्ममेकर ताहिर हुसैन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली. आमिर खान हा आज बाॅलिवूडचा स्टार अभिनेता आहे. हेच नाही तर कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आमिर खान हा आहे. आमिर खानची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहे.