न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर

आमीर खान मंगळवारी आपल्या कुटुंबासोबत हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गात आला. या दौऱ्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. | Bollywood actor Aamir khan

न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खानचा मुक्काम सिंधुदुर्गातील भोगवे बीचवर
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 9:44 AM

सिंधुदुर्ग: कोकणातील नयनरम्य निसर्ग आणि समुद्रकिनारे (Konkan Tourist places) कायमच पर्यटकांना भुरळ घालतात. त्यामुळे दरवर्षी अनेक परदेशी पर्यटक पर्यटनासाठी कोकणाला (Konkan) भेट देत असतात. मात्र, एरवी परदेशात जाऊन मज्जा करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोकणातील समुद्रकिनारे खुणावू लागले आहेत. (Aamir khan celebrates new year in Konkan famous bhogwe beach)

अभिनेता आमीर खान (Bollywood actor Aamir khan) यंदा नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणात मुक्काम करणार आहे. आमीर खान मंगळवारी आपल्या कुटुंबासोबत हेलिकॉप्टरने सिंधुदुर्गात आला. या दौऱ्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली असून आमीर खान भोगवे किनारपट्टीवरील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये चार दिवस मुक्काम करणार असल्याचे कळते. पोलीस परेड मैदानावर निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी त्यांचे स्वागत केले.

काल सायंकाळी चार वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल झाल्यानंतर आमीर खानने कार्यालयात जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांच्या या दौऱ्याची अधिकृत माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली तरी थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी आमीर खान सिंधुदुर्गात आल्याचे समजते. यावेळी आमीरसोबत त्याची पत्नी किरण राव आणि मुलगीही दिसून आली.

कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल

कोकणात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांनी सध्या समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. निसर्गरम्य हिरवाई पर्य़टकांना खुणावते आहे. कोकणातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्ली अशा ठिकाणांना पर्यटकांची जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणातील अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी फुलून गेले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या कोकणात पर्यटक दाखल झाले आहेत. कोकणात जवळपास तीन लाख पर्यटक दाखल झाले आहेत.

संबंधित बातम्या:

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? कोकणातल्या ‘या’ पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

फक्त मुंबई-पुणे नाही, दिल्ली-गुजरातमधून न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात

थर्टी फर्स्टला लोणावळ्यात जायचा प्लॅन करताय? मग हे वाचाच

(Aamir khan celebrates new year in Konkan famous bhogwe beach)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.