ऐश्वर्या राय हिने केली अभिषेक बच्चन याची कानउघडणी, तुझे कुटुंबिय..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये अत्यंत खास पद्धतीने पार पडले. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय हिने केली अभिषेक बच्चन याची कानउघडणी, तुझे कुटुंबिय..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 11:49 AM

ऐश्वर्या राय हे सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय हिने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपला जलवा दाखवला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलगीचे नाव आराध्या आहे.

अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना दिसलाय. अभिषेक बच्चन याने या मुलाखतीमध्ये सांगितले की, ज्यावेळी तो पूर्णपणे तुटलेला होता, त्यावेळी पत्नी ऐश्वर्या रायने कशाप्रकारे त्याची कानउघडणी केली. त्या स्थितीमधून तो कसा बाहेर पडला. याबद्दलच बोलताना आता अभिषेक बच्चन दिसला.

अभिषेक बच्चन म्हणाला की, कोरोनाची लागण झाल्यामुळे मला रुग्णालयातून बरे होऊन येण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. घरी आल्यावर मी तणावात होतो, कारण माझ्या हातामध्ये काहीच प्रोजेक्ट्स नव्हते. काही कमावत नसल्याची चिंता मला सतावत होती. मी तणावात गेलो आणि आतून स्वत:ला खात होतो. हे माझ्या वागण्यातून दिसून येत होते.

अभिषेक बच्चन याची ही अवस्था पाहून ऐश्वर्या राय हिने त्याला अत्यंत कठोर शब्दांमध्ये सुनावले. ऐश्वर्या राय अभिषेकला म्हणाली की, अशा आव्हानात्मक काळातही तुझे कुटुंब आनंदी आणि सुरक्षित आहे, याबद्दल आभार मानायला हवेत. कारण प्रत्येकजण तुझ्याजवळ आहे, मग काळजी नेमकी कशाची वाटत आहे?

यासर्व गोष्टी नसल्यामुळे इतर लोकांना किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीवही ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला करून दिली. त्यानंतर आपण सर्व गोष्टींकडे कशाप्रकारे बघितले हे देखील सांगताना अभिषेक बच्चन हा दिसला. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच अभिषेक बच्चन हा दिसतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.