अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, ऐश्वर्या रायची लव्ह स्टोरी…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्ह स्टोरी चाहत्यांना प्रचंड आवडते. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेकन बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. ऐश्वर्या रायची मोठी संपत्ती देखील आहे. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. आता या दोघांना एक मुलगी आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या लग्नाला 17 वर्षे देखील पूर्ण झाली आहेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले. एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना दिसला. यावेळी त्याने मैत्रीचे रूपांतर प्रेमात नेमके कसे झाले हे थेट पणे सांगितले.
अभिषेक बच्चन हा म्हणाला की, मी माझ्या करिअरच्या सुरूवातींच्या चित्रपटामध्ये ऐश्वर्यासोबत काम केले. मी आणि ऐश्वर्याने सर्वात अगोदर ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटात काम केले. आम्ही चांगले मित्र होतो. त्यानंतर आम्ही अजून एक चित्रपट ‘कुछ ना कहो’मध्येही काम करणार होतो. त्यावेळी आमच्यामध्ये एक खूप चांगली मैत्री नक्कीच होती.
वेळेनुसार आमच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 2006 मध्ये उमराव जान चित्रपटाच्या वेळी मी ऐश्वर्या राय हिच्या प्रेमात पडलो, थेट अभिषेक बच्चन हा आपली लव्ह स्टोरी सांगताना दिसला. रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन याने 2006 मध्ये ऐश्वर्या राय हिला लग्नासाठी प्रपोज केला आणि 2007 मध्ये यांनी लग्न देखील केले.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसतंय की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन याच्यामध्ये वाद सुरू आहेत आणि हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जाते. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.