Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | ‘जय बाबा भोलेनाथ’, केदारनाथमध्ये भक्तीत तल्लीन झाला ‘खिलाडी कुमार’, फोटो व्हायरल

केदारनाथ याठिकाणी शंकराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला अक्षय कुमार.. अभिनेत्याने पोस्ट केलेला फोटो पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय कुमार याची चर्चा..

Akshay Kumar | 'जय बाबा भोलेनाथ', केदारनाथमध्ये भक्तीत तल्लीन झाला 'खिलाडी कुमार', फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 4:30 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.. आता देखील एका खास कारणामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे.. खिलाडी कुमार मंगळारी केदारनाथ याठिकाणी शंकराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला आहे.. अक्षय कुमार याला केदारनाथमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा आनंद झाला. सध्या सर्वत्र अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केदारनाथ याठिकाणी पोहोचल्यानंतर अभिनेत्याने अन्य भक्तांसोबत देखील ‘हर हर महादेव’चा जप केला.. अभिनेत्याला पाहिल्यानंतर अक्षयच्या भोवती चाहत्यांची गर्दी जमली… खुद्द अक्षय कुमार याने देखील एक फोटो शेअर केला आहे…

इन्स्टाग्रामवर केदारनाथ धामचा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये ‘जय बाबा भोलेनाथ…’ असं लिहिलं आहे.. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अक्षय कुमार याच्या व्हिडीओ चर्चा आहे…

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असतो.. अनेक हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अक्षय कुमार याने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.. पण खिलाडी कुमारच्या काही सिनेमांना अपयशाचा सामना करावा लागला.. सिनेमात मिळणाऱ्या अपयशाबाबत देखील अक्षय याने मोठा खुलाला केला होता.

सिनेमांना मिळत असलेल्या अपयशाला स्वतःला जबाबदार ठरवत अक्षय कुमार म्हणाला, ‘असं माझ्यासोबत पहिल्यांदा झालेलं नाही. जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा माझे १६ सिनेमे फ्लॉप गेले. त्यानंतर आठ सिनेमे फ्लॉप ठरले.’ पुढे अभिनेता म्हणाला, ‘क्रिकेटर रोज सेंचुरी करत नाही… प्रेक्षकांना नक्की काय हवं आहे, हे मला कळत नसावं म्हणून माझे सिनेमे अपयशी ठरत असतील…’ अशी खंत अभिनेत्याने व्यक्त केलं आहे. (Akshay Kumar on film)

एवढंच नाही तर ॲक्शन सिनेमांबद्दल देखील अभिनेत्याने स्वतःचं मत व्यक्त केलं. ‘वेगळे सिनेमे करण्याकडे माझा कल होता. कारण एकच गोष्ट कितीदा करणार. जर प्रेक्षकांना ॲक्शन आवडत आहे, तर पुन्हा ॲक्शन सिनेमांमध्ये काम नक्की करेल…मी बदलावं असं प्रेक्षकांना वाटत असेल, तर नक्की बदलण्याचा प्रयत्न करेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या अभिनेत्याचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत..

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, दत्तात्रय गाडेला बेड्या
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, दत्तात्रय गाडेला बेड्या.
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.