राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचे आमंत्रण, तरीही अक्षय कुमार जॉर्डनमध्ये, अखेर अभिनेत्याने सांगितले कारण, तो व्हिडीओ…

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अनेक बाॅलिवूड कलाकार उपस्थित आहेत. आता या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचे आमंत्रण, तरीही अक्षय कुमार जॉर्डनमध्ये, अखेर अभिनेत्याने सांगितले कारण, तो व्हिडीओ...
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 12:45 PM

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अनेक बाॅलिवूड कलाकार हे पोहचले आहेत. खास निमंत्रण कलाकारांना या सोहळ्याचे मिळाले. संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा उत्साह हा बघायला मिळतोय. कालच काही बाॅलिवूड कलाकार हे अयोध्येत दाखल झाले. यामध्ये अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू निगम, कतरिना कैफ, विकी कौशल, माधुरी दीक्षित, कंगना राणावत हे कलाकार पोहचले आहेत. आता या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे निमंत्रण हे अक्षय कुमार याला देखील होते. मात्र, या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अक्षय कुमार हा पोहचला नाहीये. आता अक्षय कुमार याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती ही शेअर करताना अक्षय कुमार हा दिसतोय.

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार याच्यासोबत टायगर श्रॉफ हा देखील दिसतोय. अक्षय कुमार याने म्हटले की, जय श्रीराम…राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सर्वांना खूप शुभेच्छा…जय श्री राम…माझ्यासोबत आणि टायगर श्रॉफ आहे. आम्हा दोघांकडून तुम्हा खूप साऱ्या शुभेच्छा… जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे की राम लल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात येत आहेत. अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला पोहचू शकला नाहीये. याच्याबद्दलच माहिती देताना अक्षय कुमार हा दिसतोय.

बडे मियां छोटे मियांच्या शूटिंगमध्ये अक्षय कुमार हा व्यस्त आहे. आता सोशल मीडियावर अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते हे अक्षय कुमार याच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.