Akshay Kumar | अक्षय कुमार याची मोठी घोषणा, सलग पाच चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. अक्षय कुमार याचा जलवा कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सेल्फी हा चित्रपट देखील फ्लाॅप गेलाय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. एका मागून एक असे तब्बल पाच चित्रपट अक्षय कुमार याचे फ्लाॅप गेले आहेत. अक्षय कुमार याची जादू बाॅक्स आॅफिसवरून (Box office) गायब झाल्याची जोरदार चर्चा आहे. अक्षय कुमार हा बाॅलिवूडचा अशा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट (Movie) काही खास जलवा दाखू शकत नाहीयेत. हा अक्षय कुमार याच्यासाठी मोठा झटका म्हटले तर चुकीचे ठरणार नाहीये.
सततच्या फ्लाॅप चित्रपटांनंतर आता अक्षय कुमार याने एक अत्यंत मोठी घोषणा केलीये. अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती ही चाहत्यांसोबत शेअर केलीये. अक्षय कुमार याने हाऊसफुल 5 चे पोस्टर शेअर केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर केलीये.
हाऊसफुल 5 चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत रितेश देशमुख हा देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे हाऊसफुल 5 मध्ये असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर कलाकारांची नावे अजनूही पुढे आली नाहीयेत. आता अक्षय कुमार याचा हाऊसफुल 5 काय धमाल आणि कमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
विशेष म्हणजे हाऊसफुल 5 हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सतत पाच चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर अक्षय कुमार याच्यासाठी हाऊसफुल 5 हा चित्रपट अत्यंत महत्वाचा असणार आहे. हाऊसफुल 5 कडून अक्षय कुमार याला मोठ्या अपेक्षा या नक्कीच असणार आहेत. अक्षय कुमार याने शेअर केलेले हे हाऊसफुल 5 ची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर कमेंट करताना देखील दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. विशेष म्हणजे सेल्फी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही अक्षय कुमार हा दिसला होता. सेल्फी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर फक्त 16.85 कोटींची कमाई केलीये. अक्षय कुमार याच्या करिअरमधील सर्वाधिक कमी कमाई करणारा हाच चित्रपट ठरलाय.