Net Worth | वर्षाला 4-5 सुपरहिट चित्रपट, करोडोंचा दानधर्म, पाहा अक्षय कुमारची संपत्ती किती?

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्याबद्दल सर्वांना ठाऊक आहे की, तो एका वर्षात अनेक चित्रपट करतो. रोमँटिक, अॅक्शन आणि विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या अक्षयचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे.

Net Worth | वर्षाला 4-5 सुपरहिट चित्रपट, करोडोंचा दानधर्म, पाहा अक्षय कुमारची संपत्ती किती?
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 8:40 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्याबद्दल सर्वांना ठाऊक आहे की, तो एका वर्षात अनेक चित्रपट करतो. रोमँटिक, अॅक्शन आणि विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या अक्षयचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे, हे आपणा सर्वांनाच माहित असले. पण, अक्षयच्या नेट वर्थबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. अक्षय कुमार हा असा बॉलिवूड स्टार आहे, ज्याने स्वतः खूप मेहनत आणि संघर्ष करून स्वतःचे हे खास स्थान बनवले आहे (Bollywood actor Akshay Kumar total net worth).

Caknowledge.com वेबसाईटच्या अहवालानुसार बॉलिवूडचा ‘हिट मशीन’ अभिनेता अक्षय कुमार याची सध्याची संपत्ती तब्बल 2000 कोटी आहे. अक्षयची मासिक कमाई तब्बल 4 कोटींपेक्षा जास्त आहे, तर वर्षासाठी 40-50 कोटी आहे. अक्षयची बरीचशी कमाई ही ब्रँड अ‍ॅन्डॉर्सेसमधून झाली आहे. अक्षय प्रत्येक अ‍ॅन्डॉर्समेंटसाठी 6 कोटी मानधन घेतो. या व्यतिरिक्त तो चित्रपटाच्या नफ्यातलाही मोठा भाग घेतो. त्याचे एका वर्षात किमान 4-5 चित्रपट रिलीज होतात.

अक्षय कुमार याचे घर

अक्षय कुमारचे मुंबईच्या जुहू या प्राईम बीचवर लक्झरी बंगला आहे. त्याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. याशिवाय त्याच्याकडे देश-विदेशात देखील अनेक मालमत्ता आहेत.

अक्षयच्या कार

Caknowledge.comcच्या अहवालानुसार अक्षय कुमारकडे 11 लक्झरी वाहने आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बेंटली, होंडा सीआरव्ही आणि पोर्श या ब्रॅण्ड्सच्या गाड्या आहेत. अक्षयला बाईक्सचीही आवड आहे आणि म्हणूनच त्याच्याकडे बर्‍याच मोठ्या ब्रॅण्डच्या बाईकसुद्धा आहेत (Bollywood actor Akshay Kumar total net worth).

अक्षयची एकूण कमाई :

2019 : 446 कोटी

2018 : 270 कोटी

2016 : 269 ​​कोटी

2015 : 207 कोटी

2014 : 201 कोटी

2013:   112 कोटी

2012 :   69 कोटी

अक्षयकडे चित्रपटांची रांग

अक्षयच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याचा शेवटचा चित्रपट ‘लक्ष्मी’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. सध्या अक्षयकडे रिलीजसाठी अनेक चित्रपट सज्ज आहेत, पण लॉकडाऊनमुळे सर्व विलंब होणार आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘राम सेतु’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांमध्ये त्याची एक वेगळी शैली दिसणार आहे.

(Bollywood actor Akshay Kumar total net worth)

हेही वाचा :

Pearl Puri | अभिनेत्याला जामीन नाहीच! पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Must Watch Movies | ‘दिल बेचारा’ ते ‘शेप ऑफ वॉटर’, हॉटस्टारवरील ‘हे’ गाजलेले चित्रपट आवर्जून बघाच!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.