“का? का? का?” सुशांतच्या आत्महत्येचे कोडे अनाकलनीय, महानायकही गहिवरले
अमिताभ बच्चन यांनी सुशांत तू आम्हाला न सांगता, न विचारता का गेलास? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. (Amitabh Bachchan On Sushant Singh Rajput Suicide)
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडला जबरदस्त धक्का बसला आहे. बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सुशांत तू तुझं आयुष्य का संपवलंस, आम्हाला न सांगता, न विचारता का गेलास? असे अनेक प्रश्न त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत विचारले आहेत. (Amitabh Bachchan On Sushant Singh Rajput Suicide)
सुशांतच्या आत्महत्येनंतर भावूक झालेल्या अमिताभ बच्चन यांनी सुशांतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी “सुशांत अखेर का…का…का? तू तुझं आयुष्य का संपवलंस? तू एक उत्तम अभिनेता होतास, मात्र काहीही न सांगता, काहीही न मागता तू अचानक निघून गेलास?” असे प्रश्न अमिताभ बच्चन यांनी उपस्थित केले आहेत
त्यानंतर पुढे सुशांतची स्तूती करताना अमिताभ म्हणाले, “माझ्या मते जेवढं तुझं काम चांगलं होतं, तेवढाचं तू हुशारही होतास. तुझं बोलणं तोलून मापून असायचं. तसेच तुझं असणही तोलून मापूनचं असायचे,” असेही अमिताभ बच्चन म्हणाले.
अमिताभ बच्चन यांनी सुशांतचा चित्रपट ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ याचाही या पोस्टबाबत म्हटलं आहे. “मी त्याचा धोनी या चित्रपटातील काम पाहिले. त्यात त्याचे काम उल्लेखनीय असे होते. सुशांत जेव्हा कधी बोलायचा तेव्हा त्याचा आवाज अचानक गप्प व्हायचा. त्याला काहीतरी सांगायचे होते,” असेही बच्चन म्हणाले. (Amitabh Bachchan On Sushant Singh Rajput Suicide)
“मी एकदा सुशांतला भेटलो होतो, त्यावेळी मी त्याला धोनी चित्रपटातील शेवटच्या षटकाराबाबत विचारलं. तो विजयी षटकार तू कसा शिकलास असे विचारले होते. यावर त्याने मी धोनीचा तो व्हिडीओ जवळपास 100 वेळा पाहिला,” असे म्हटलं होतं. यावरुन तो चित्रपटाबाबत किती गंभीर आहे,” असेही दिसते.
“त्याची सुरुवात आमच्या काळातील महान कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्या डान्स ग्रुपपासून झाली. तो चौथ्या रांगेत डान्स करायचा. तिथून तू इथपर्यंत पोहोचलास ही स्वत:च एक महान गाथा आहे. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टोकाकडेच नेतो. कोणते विचार आत्महत्येकडे नेतात याचे मोठे गूढ आहेत. मोठ्या कष्टाने कमावलेलं आयुष्य जगू दिले गेले नाही,” असे अमिताभ बच्चन म्हणाले.
सुशांतची आत्महत्या, बॉलिवूडसह चाहतेही शोकसागरात
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत.
सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टही आले असून गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. (Amitabh Bachchan On Sushant Singh Rajput Suicide)
संबंधित बातम्या :
सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला