ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अमिताभ बच्चन यांनी शेअर केली लेकाबद्दल अशी पोस्ट, म्हणाले, प्रेम…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आता त्यामध्येय अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चन यांच्याबद्दल खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाची चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबासोबत न येता आपली मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत दाखल झाली. यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला. अभिषेक बच्चन याचे घर सोडून ऐश्वर्या राय ही माहेरी राहात असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहतेही हैराण होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर बच्चन कुटुंबियांकडून काहीही भाष्य करण्यात आले नाहीये.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी ते कायमच खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी लेक अभिषेक बच्चन याला रिपोर्ट करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन हे लेकाचे काैतुक करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत लिहिले की, अभिषेक तू खूप जास्त कूल आहेस…प्रेम आणि अजूनही बरेच काही…यासोबत बिग बी यांनी काही इमोजीही शेअर केले आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
T 5080 – Abhishek you are too cool .. Love and more !! ❤️ https://t.co/qKzVHa92Cp
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 22, 2024
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी लेकाचे काैतुक करणारी पोस्ट शेअर केलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होण्याचे कारण श्वेता बच्चन असल्याचेही सतत सांगितले जातंय. श्वेता बच्चन ही आपल्या दोन्ही मुलांसोबत जलसा या बंगल्यावरच राहते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय ही विदेशात जाताना दिसली. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन हा तिच्यासोबत नव्हता तर मुलगी आराध्या हिला घेऊनच ऐश्वर्या राय ही विदेशात निघाली. ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले.