ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच अमिताभ बच्चन यांनी शेअर केली ‘ही’ पोस्ट, म्हणाले, वेळ…

Aishwarya Rai and Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय ही यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे देखील सांगितले जाते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच अमिताभ बच्चन यांनी शेअर केली 'ही' पोस्ट, म्हणाले, वेळ...
Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 7:32 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचा घटस्फोटही झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. घटस्फोटानंतर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असून ती सध्या तिच्या आईच्या घरी राहत आहे. आराध्या बच्चन ही देखील ऐश्वर्यासोबतच राहत असल्याचे सांगितले गेले.

सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, यावर ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली होती. त्यावेळीही अभिषेक बच्चन हा त्यांच्यासोबत नव्हता.

आता ऐश्वर्या राय ही विदेशातून परत आल्यानंतर सासरे अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच खास पोस्ट किंवा व्हिडीओ फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करतात.

नुकताच शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, केबीसीमध्ये काम… खूप वेळ सुरू असते, पण स्पर्धकांसोबतचा माझा संवाद मला भावना आणि चांगल्या मनोरंजनाने भरतो… आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. लोक मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करत आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर अनेक चर्चांना उधाण आलंय. लोकांचे म्हणणे आहे की, सतत ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे, परंतू अमिताभ बच्चन यावर भाष्य करत नाहीत. अमिताभ बच्चन इतर पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात पण घटस्फोटाबद्दल बोलत नाहीत. अनेकांचे म्हणणे आहे की, बच्चन कुटुंबियांमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू नसल्यानेच यावरून कळत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.