अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा आहेत तब्बल इतक्या कोटी संपत्तीचे मालक, मुलगी श्वेता आणि नात नव्या देखील….

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हेच नाही तर निखिल नंदा हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा ही बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. श्वेताची लेक नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा आहेत तब्बल इतक्या कोटी संपत्तीचे मालक, मुलगी श्वेता आणि नात नव्या देखील....
Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 12:49 PM

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. काैन बनेंगा करोडपतीमध्ये ते मोठे खुलासे करतानाही कायमच दिसतात. अमिताभ बच्चन यांच्या घरात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट होणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांनी भाष्य केले नाहीये.

दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लेक श्वेता हिच कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुंबईतील प्रतिक्षा हा बंगला श्वेताच्या नावावर केला. हेच नाही तर श्वेता बच्चन आपल्या मुलांसोबत जलसा याच बंगल्यावर राहते.

श्वेता बच्चन हिचा पती निखिल नंदा हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. फक्त निखिल नंदा हाच नाही तर श्वेता आणि तिची लेक नव्या या देखील मोठ्या संपत्तीच्या मालक आहेत. अमिताभ बच्चन यांचा जावई निखिल नंदा याच्याकडे रिपोर्टनुसार 60 कोटींची संपत्ती आहे. निखिल नंदा ‘एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे.

अहवालानुसार 2021 पर्यंत या कंपनीचा महसूल 7014 कोटी रुपये (70 अब्ज) होता. रिपोर्टनुसार या कंपनीत निखिल नंदा यांचा पगार 13.1 कोटी रुपये आहे आणि ग्रुपमध्ये त्यांची 36.59% हिस्सेदारी आहे.  निखिल नंदा हा करिश्मा कपूरची आत्या रितू नंदा यांचा मुलगा आहे. श्वेता नंदा ही बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. 

हेच नाही तर नव्या नवेली नंदा ही देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार नाहीये. नव्या ही वडील निखिल नंदा यांच्यासोबत त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची मदत करते. नव्या ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नव्या ही तिच्या शोमध्ये कायमच मोठे खुलासे करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच एक जाहिरात नव्या हिने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.