अमिताभ बच्चन ‘या’ कारणामुळे अभिषेकवर प्रचंड नाराज, थेट रूमच्या बाहेर काढत…
अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन हा देखील चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसतो.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिषेक बच्चनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतो. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन हा कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अभिषेक बच्चन हा दिसतो. अभिषेक बच्चन याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याची चर्चा ही सातत्याने रंगताना दिसतंय. हेच नाही तर लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे घटस्फोट घेणार असल्याचेही सांगितले जाते. मात्र, यावर ना अभिषेक बच्चन ना ऐश्वर्या राय कोणीही भाष्य केले नाहीये. खरोखरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार का हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
अभिषेक बच्चन हा आताच नाही तर कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिषेक बच्चन याने 2000 मध्ये रिफ्यूजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. अमिताभ बच्चन यांचा लेक बॉलिवूडमध्ये पर्दापण करत असल्याने त्याच्या या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अभिषेक बच्चन याचा हा चित्रपट फ्लॉप गेला. अभिषेक बच्चन याच्यावर एकदा अमिताभ बच्चन हे चांगलेच नाराज झाले होते.
त्याचे झाले असे की, एका चित्रपटात अभिषेक बच्चन हा चक्क पाकिस्तानी आतंकवाद्याची भूमिका साकारणार होता. हेच नाही तर चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात झाली. या चित्रपटाचे नाव समझोता एक्सप्रेस होते. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार होता. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा चित्रपट होता.
याबद्दल स्वत: राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी म्हटले होते की, हा चित्रपट आगीसोबत खेळल्याप्रमाणे होता. यामुळे हा चित्रपट करण्यास सर्वचजण नकार देत होते. अभिषेक बच्चन याला ही स्क्रिप्टही आवडली. माझा आणि अभिषेक बच्चन याचा हा पहिला चित्रपट होणार होता. मात्र, पुढे जे काही घडले, त्यानंतर मी चित्रपटाची स्क्रीप्टही जाळून टाकली होती.
तीन महिने चित्रपटाची शूटिंग सुरू होती आणि त्यानंतर सर्वकाही बंद करण्यात आले. अभिषेक बच्चन याने या चित्रपटाची स्किप्ट ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना वाचून दाखवली, त्यावेळी अमिताभ बच्चन चांगलेच नाराज झाले. मी चित्रपटात आतंकवादी बनणे अजिबात आवडले नाही. त्यांनी मला थेट रूमच्या बाहेर जाण्यासही सांगितल्याचा खुलासा अमिषेक बच्चन याने केला. थ