अभिषेक बच्चन याचे मोठे विधान, थेट म्हणाला, मर्यादा ओलांडल्या…

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चन याचे मोठे विधान, थेट म्हणाला, मर्यादा ओलांडल्या...
Abhishek Bachchan and Aishwarya Rai
Follow us
| Updated on: Jul 25, 2024 | 3:50 PM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर भाष्य करणे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी टाळले आहे. फक्त ऐश्वर्या राय किंवा अभिषेकच नाहीतर बच्चन कुटुंबियांनीही यावर भाष्य केले नाहीये. सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. ग्रे घटस्फोट ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये थेट सांगितले.

ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडला असून ती आपल्या माहेरी मुलगी आराध्या हिच्यासोबत राहत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वादाचे कारण श्वेता बच्चन असल्याचेही सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली होती, आता त्या मुलाखतीबद्दलच बोलताना अभिषेक बच्चन हा दिसतोय.

मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा म्हणाला होता की, माझी सोशल मीडियाबद्दल अगदी स्पष्ट भूमिका आहे. मी सोशल मीडियावर काही गोष्टींचा आनंद घेतो. मला सोशल मीडियावरही काही गोष्टी आवडतात तर काही गोष्टी अजिबात नाही. माझ्या मुलाला काही गोष्टींपासून दूर ठेवा असेही ज्युनिअर बी बिगने म्हटले.

मी तुम्हाला माझ्या सोशल मीडिया हँडलवर त्यावर चर्चा करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. मी कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. जर मला वाटले की, मर्यादा ओलांडल्या जात आहेत तर मी बोलेन आणि हा माझा अधिकार आहे, या मुलाखतीमध्ये काही गोष्टींवर स्पष्ट मत मांडताना अभिषेक बच्चन हा दिसतोय. 

तशी अभिषेक बच्चन याची ही मुलाखत जुनी आहे, मात्र सध्या जोरदार चर्चेत आहे. आराध्या बच्चन ही काही दिवसांपूर्वीच आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत विदेशात गेली. आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.