Ranbir Kapoor | ‘मैं झेल रहा हूं…’, जेव्हा रणबीरने सांगितले बेडरूम सीक्रेट्स; आलियाबद्दल अभिनेता म्हणाला…
रणबीरने सांगितले बेडरूम सीक्रेट्स, यावर आलिया स्पष्टीकरण थक्क करणारं... सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी लग्न केलं. रणबीर आणि आलिया कामय चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. शिवाय अनेक ठिकाणी दोघं एकत्र देखील दिसतात. एवढंच नाही तर, मुलाखतींमध्ये आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या नात्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. आता तर अभिनेत्याने बेडरूम सीक्रेट्स सांगितले आहेत. ज्यामुळे आलिया आणि रणबीर यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्याने मुलाखतीत आलियाच्या वाईट सवयींबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे रणबीर म्हणाला ‘मैं झेल रहा हूं…’ सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.
रणबीर आणि आलिया सध्या आगामी सिनेमा ‘रामायण’मुळे चर्चेत आहेत. सिनेमात राम आणि सीता या भूमिकांमध्ये दोघांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. दरम्यान नुकताच झालेल्या मुलाखतीत रणबीरने आलियाच्या झोपण्याच्या वाईट सवयीबद्दल सांगितलं. अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा आलिया झोपते तिला पूर्ण बेड कमी पडतो. डोके कुठेतरी, हात कुठेतरी आणि पाय कुठेतरी. ज्यामुळे मला एका कोपऱ्यात झोपावं लागतं..
रणबीरच्या वक्तव्यानंतर आलिया म्हणतो, ‘तू हे सगळं सहण करतोस…’ यावर रणबीर म्हणतो, ‘करावं लागतं…’ एवढंच नाहीतर आलियाने देखील रणबीरची एक वाईट सवय सांगितली. अभिनेत्री म्हणाली, ‘मी कोणती गोष्ट सहण करत असेल ती म्हणजे रणबीरचा शांत स्वभाव.. मी जेव्हा त्याला काही विचारते तो शांत बसून राहतो.. कधीकधी तर मी त्याला हलवून बोलायला लावते… तरी देखील रणबीर काहीही बोलत नाही..’ असं आलिया रणबीरबद्दल म्हणाली…
आलिया आणि रणबीर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. शिवाय त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या देखील तुफान चर्चा रंगलेल्या असतात. रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केल्याच्या अभिनेत्रीने दोन महिन्यांनंतर अभिनेत्री सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर यांनी मुलीचं नाव राहा कपूर असं ठेवलं आहे. पण आलियाने अद्याप लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आलिया आणि रणबीर यांनी मुलीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण अभिनेत्रीने अद्याप लेकीसोबत फोटो शेअर केलेला नाही.