‘हा’ अभिनेता लहानपणी मागायचा भीक, मुंबईच्या धारावीमध्ये राहायचं अभिनेत्याचं कुटुंब, कसे झाले प्रसिद्ध स्टार?

कुटुंबाची भूक भागवण्यासाठी भीक मागणारा 'हा' अभिनेता कसा झाला सुपरस्टार... आई - वडील विभक्त झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी अभिनेत्याच्या खांद्यावर... पण आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने...

'हा' अभिनेता लहानपणी मागायचा भीक, मुंबईच्या धारावीमध्ये राहायचं अभिनेत्याचं कुटुंब, कसे झाले प्रसिद्ध स्टार?
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:00 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, ज्यांनी लहानपणापासून अनेक संकटांचा सामना केला. नशीबात ज्या गोष्टी आहेत, त्या एका ठरावीक काळानंतर मिळतात.. असं म्हणतात… तर काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत देखील असंच काही झालं आहे. लहानपणी असंख्या कष्ट केलेल्या अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि पैसा, प्रसिद्धी मिळवली. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते कादर खान... हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह म्हणजेच अभिनेते कादर खान. अभिनयासह संवादलेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. अभिनेते कादर खान यांचं कॅनडात झालं. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्ष उलटली आहेत. पण त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही तेवढीच मोठी आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह म्हणजेच अभिनेते कादर खान. अभिनयासह संवादलेखनातही त्यांनी आपला ठसा उमटवला. अभिनेते कादर खान यांचं कॅनडात झालं. पण आजही त्यांच्या अनेक आठवणी जिवंत आहेत. कादर खान आज आपल्यात नसले तरी, त्यांचे अनेक डायलॉग जगण्यासाठी नवी उमेद देतात. कादर खान यांच्या आयुष्यातील अनेक किस्से आजही तुफान चर्चेत असतात. कादर खान यांचा जन्म अफगानिस्तान याठिकाणी झाला होता. पण कादर खान जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांचं कुटुंब मुंबई येथील धारावी याठिकाणी आलं. कादर खान यांचं लाहनपण प्रचंड हालाखीचं होतं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कादर खान यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

हे सुद्धा वाचा

कादर खान जेव्हा लहान होते, तेव्हाच त्यांचे आई – वडील विभक्त झाले. अशा परिस्थितीत अभिनेत्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. कादर खान यांनी कुटुंबाची भूक भागवण्यासाठी भीक मागण्याची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेल्या कादर खान यांचं बालपण संघर्षमय होतं. आज कादर खान यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेवू.

मीडिया रिपोर्टनुसार, आई – वडील विभक्त झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी कादर खान यांच्या खांद्यावर आली. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी कादर खान भीक मागायचे. कादर खान एका मशिदीसमोर मागचे आणि त्यातून मिळालेल्या रुपयांमधून कुटुंबाची भूक भागवायचे. त्यानंतर कादर खान यांच्या आईने त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कादर खान यांनी मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

कादर खान अभ्यासात फार हुशार होते. शिक्षणासोबतच त्यांनी थिएटरशीही देखील नातं जोडलं. थिएटरमुळेच कादर खान यांना नवीन ओळख मिळाली. कादर खान यांची अभिनयाप्रती असलेली ओढ त्यांना चित्रपटांमध्ये घेऊन आली होती. त्यानंतर कादर खान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. कादर खान यांनी कायम त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंज केलं.

एकदा दिलीप कुमार यांनी कादर खान यांचं नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कादर खान यांचं नाटक पाहून दिलीप कुमार यांनी त्यांना दोन सिनेमांची ऑफर दिली. १९७३ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘दाग’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं, तर त्यांनी जवळपास २५० सिनेमांमध्ये डायलॉग लिहिले होते. कादर खान यांचे 2018 मध्ये निधन झाले. कादर खान यांच्या निधनामुळे चाहते आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला…

'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.