Arjun Kapoor | मलायका अरोरासोबत ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर याच्या आयुष्यात ‘या’ महिलेची एन्ट्री! कोण आहे ती?

Arjun Kapoor | मलायका अरोरा हिच्यानंतर 'या' महिलेला डेट करतोय अर्जुन कपूर, ती म्हणाली, 'माझ्या आईला कळल्यानंतर तिला...'; सध्या सर्वत्र अर्जुन कपूर आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Arjun Kapoor | मलायका अरोरासोबत ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर याच्या आयुष्यात 'या' महिलेची एन्ट्री! कोण आहे ती?
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 8:56 AM

मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या आयुष्यात घटस्फोटानंतर अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. पण आता मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगत आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही तर, मलायका हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन याच्या आयुष्यात नव्या महिलेची देखील एन्ट्री झाल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे नक्की सत्य काय आहे? असा प्रश्न मलायका आणि अर्जुन यांच्या चाहत्यांना पडला आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याला विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण दोघांमध्ये असलेलं नातं अनेकांना आवडतं देखील. पण आता मलायका आणि अर्जुन यांचं नातं तुटल्याची चर्चा जोर धरत आहे.

मलायका हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अर्जुन याच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली असल्याचं समोर येत आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला आहे. रंगल्या चर्चांवर कुशा कपिला हिने मौन सोडलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

अर्जुन कपूर याच्या नावसोबत आपल्या नावाची चर्चा होत असल्यामुळे कुशा कपिला म्हणाली, ‘माझ्याबद्दल साध्या जी काही बेताल बडबड सुरु आहे, ती आधी बंद करा. हे सगळं ऐकून वाचून मला स्वतःचा एक फॉर्मेट परिचय करून द्यावा लागेल. मी फक्त एकच प्रार्थना करते की, या सर्व रंगणाऱ्या चर्चा माझ्या आईपर्यंत पोहोचता कामा नये. कराण तिला मोठा धक्का बसून शकतो..’ असं म्हणत कुशा कपिला हिने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुशा कपिला हिला अर्जुन कपूर याच्यासोबत दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी स्पॉट करण्यात आलं होतं. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशात अर्जुन याच्यासोबत मलायका नसल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. याआधी देखील अनेकदा अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

पण रंगणऱ्या ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांनी प्रतिक्रिया दिली होती. पण आता यावर दोघांपैकी एकानेही वक्तव्य केलेलं नाही. ज्यामुळे ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत. दरम्यान, अर्जुन याने सोशल मीडियावर सोलो ट्रीपचे फोटो पोस्ट केले होते. म्हणून दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या. सध्या चाहत्यांमध्ये अर्जुन कपूर आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.