Arjun Kapoor याचं अनेक वर्षांनंतर स्वप्न पूर्ण, अभिनेता भावना व्यक्त करत म्हणाला…, पाहा व्हिडीओ
कायम अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असणारा अर्जुन आज त्याच्या स्वप्नांमुळे चर्चेत, अभिनेत्याचं स्वप्न अखेर झालं पूर्ण... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा
मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यामागे कारण देखील प्रचंड खास आहे. अर्जुन कपूर याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ज्यामुळे अभिनेता प्रचंड आनंदी आहे. कायम अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असणारा अर्जुन आज त्याच्या स्वप्नांमुळे चर्चेत आला आहे. स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. प्रत्येकाची काही स्वप्न पूर्ण होतील असं नाही. पण अर्जुन कपूर याचं खास स्वप्न पूर्ण झालं आहे. बकेट लिस्टमधील हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्याने पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र अर्जुन कपूर याची चर्चा आहे.
तर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की अभिनेत्याचे नक्की कोणतं स्वप्न पूर्ण झालं. अर्जुन कपूर पहिल्यांदा त्याच्या वडिलांसोबत बाहेर फिरायला गेला. शिवाय अभिनेत्याने स्वप्न पूर्ण झालं असं देखील लिहिलं आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने वडिलांसोबत सहलीची ए़क झलक दाखवली आहे. बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत व्यतीत केलेले खास क्षण अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र अर्जुन कपूर आणि बोनी कपूर यांची चर्चा सुरु आहे.
वडिल बोनी कपूर यांच्यासोबत एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, ‘हॅन्स झिमर याचं सादरीकरण पाहणं माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. सादरीकरण प्रेरणादायी होतं. हॅन्स झिमर या जगातील सर्वात प्रतिभावान लोकांपैकी एक आहे. त्याला आणि त्याचा शो इतक्या जवळून पाहणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मला त्याचं संगीत नेहमीच आवडतं.
View this post on Instagram
‘द लायन किंग, ग्लॅडिएटर, द डार्क नाइट ट्रायलॉजी, इनसेप्शन, मॅन ऑफ स्टील, इंटरस्टेलर सारखे अप्रतिम सिनेमे पाहून मी मंत्रमुग्ध झालो. मला त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट देखील अनुभवायला मिळाला याचा मला खूप आनंदी आणि उत्साही आहे. असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुढे अर्जुन कपूर म्हणाला, ‘माझ्या वडिलांसोबत माझी ही पहिली ट्रीप असल्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. याआधी आम्ही कधीही एकत्र फिरण्याचा आनंद लुटला नाही. वडिलांसोबत फिरणं, मज्जा करणं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणं माझ्यासाठी फान खास होतं. ते देखील हॅन्स झिमर याचे चाहचे आहेत आणि आम्ही दोघांनी शोचा आनंद लुटला. यासाठी आणि आधीपासून योजना केली होती, जी फार खास राहिली…
अर्जुन कपूर याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘द लेडीकिलर’ या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अर्जुन याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.